How close is Bangladesh to Sri Lankan situation: करोनाचे संकट कमी होत असताना, आर्थिक संकटांचा सामना जगाला करावा लागला. यात श्रीलंका देशाचे काय हाल झाले, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. तसेच काहीसे चित्र भारताच्याच शेजारील बांग्लादेशात पाहायला मिळत आहे. अर्थव्यवस्था कोलमडू लागल्यामुळे नागरिक रस्त्यांवर उतरुन आंदोलने करत आहेत, पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजिनाम्याची मागणी करत आहेत तर दुसरीकडे विरोधक संपूर्ण संसदच बरखास्त करावे यासाठी पेटून उठले आहेत.
कपडा व्यापर घटला, निर्यातीत घट झाली (Clothing trade declined, exports declined)-
कापड उद्योगात, भारताला मागे टाकून बांग्लादेश प्रथम क्रमांकावर गेला होता. सर्वाधिक सुती कापड निर्यात करणारा देश बनला होता. हँडलुममधले भारताचे महत्त्व कमी होऊन परदेशी ग्राहक बांग्लादेशच्या कपड्यांकडे वळले होते. मात्र मागील वर्षापासून कापड उद्योगात नावीन्य, नवीन तंत्र तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध न केल्यामुळे हळूहळू कापड उद्योग कमी होऊ लागला. त्यात रशिया - युक्रेनच्या युद्धामुळे निर्यात करणे कठीण झाले. कापड व्यवसायिक सध्या कर्जाखाली बुडाले आहेत, कापड निर्यात नावाला सुरू आहे. या स्थितीत परकीय चलानाचा साठा झपाट्याने घटत आहे. बांग्लादेशचे एकूण परकीय कर्ज तब्बल 239 टक्क्यांनी वाढले आहे. कर्जाची रक्कम 91.43 अब्ज युएस डॉलरवर पोहोचले आहे. मागील वर्षी श्रीलंकेच्या परकीय कर्जाचा आकडा 119 टक्क्यांनी वाढला होता. यावरुन, बांग्लादेशची परिस्थिती श्रीलंकेपेक्षा बिकट आहे. तसेच त्यांच्या चलनवाढीचा दर 9 टक्क्यांनी वाढला आहे.
करोना काळातच बांग्लादेश अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. या काळात 10 लाख व्यक्ती बरोजगार झाले होते. करोनानंतरही देशात नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध झालेल्या नाहीत, यामुळे बेरोजगारीत भर पडत आहे. करोनानंतरही बांग्लादेशी उत्पादनाला मागणी वाढलीच नाही, उलट ती आणखी 30 टक्क्यांनी घटली. बांग्लादेश मासे, सुकी मच्छी, फळे - भाज्यांपासून बनलेले बायप्रोडक्ट्स, कापड, कपडे, विविध धागे आदी वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात करते. मात्र ही निर्यात खूपच घटली आहे, त्यामुळे शेतकरी, व्यवसायिक यांच्यावर उत्पादने फेकून देण्याची वेळ आली आहे. देशांतर्गतही खप न होत असल्यामुळे त्यांच्या उपासमारीची वेळ आली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदतीची अपेक्षा (Expect help from the International Monetary Fund)-
बांग्लादेशमध्ये महागाईचा चढता क्रम सुरू आहे. तब्बल 80 ते 95 टक्के वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. तर, इंधनाचे दर 50 टक्क्यांनी वधारले आहेत. देशाला एकूण 42.6 अब्ज युएस डॉलर किंमतीचे इंधन अयात करावे लागले आहे. रशिया - युक्रेन युद्ध आणि इतर आर्थिक घडामोडींमुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. त्याच परिस्थिती बांग्लादेशाची आर्थिक घडी विस्कळीत झालेली असूनही महागड्या जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत, आयात कराव्या लागत आहेत. उत्पन्न कमी, बेरोजगारी, वाढती महागाई या परिस्थिती देशवासियांनी काय करावे हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे देशवासीय रस्त्यांवर उतरुन आंदोलन करत आहेत. विरोधक सरकार पाडून नवे सरकार स्थापन करण्याची मागणी करत आहेत.
बांग्लादेश या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF- International Monetary Fund) मदत घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. 4.5 अब्ज युएस डॉलरची मागणी बांग्लादेशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे केली आहे. यावर सध्या प्रक्रिया सुरू आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सांगण्यात आले आहे.