Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Insurance : कार इन्शुरन्सचा क्लेम नाकारला जाण्याची 'ही' आहेत महत्त्वाची कारणे

Car Insurance : कार इन्शुरन्सचा क्लेम नाकारला जाण्याची 'ही' आहेत महत्त्वाची कारणे

तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडे कार इन्शुरन्स क्लेम (Car Insurance claim) पाठवला आणि तो नाकारला गेला. तर त्याचे कारण म्हणजे तुमच्या विमा कंपनीने विमा पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या काही अटी आणि शर्ती आहेत. नुकसान किती प्रमाणात आहे आणि तुमच्या विमा पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे यावर तुमची विमा कंपनी दावा पास करते. मात्र, विमा नाकारण्याची नेमकी काय कारणे आहेत ते आपण जाणून घेऊ

कार खरेदी करताना आपण सर्वसमावेशक विमा खरेदी करतो. ज्यामुळे आपला भविष्यात दुर्दैवाने दुर्घटना झाल्यास संभाव्य आर्थिक खर्च भरून निघू शकतो. मात्र, विमा पॉलिसी कितीही सर्वसमावेशक असेल तरीही काही प्रमुख कारणांमुळे तुमचा दावा रद्द होण्याची शक्यता असते. नेमके कोणत्या कारणामुळे तुमच्या वाहनाचा दावा रद्द होऊ शकतो, याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडे कार इन्शुरन्स क्लेम (Car Insurance claim) पाठवला आणि तो नाकारला गेला. तर त्याचे कारण म्हणजे तुमच्या विमा कंपनीने विमा पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या काही अटी आणि शर्ती आहेत. नुकसान किती प्रमाणात आहे आणि तुमच्या विमा पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे यावर तुमची विमा कंपनी दावा पास करते. मात्र, काही वेळा नियमबाह्य गोष्टी असतील तर विमा कंपनी तुमच्या कारचा विमा क्लेम नाकारू शकते. विमा कंपन्यांनी तुमचा दावा मंजूर करण्यास नकार देण्यामागे पुढील कारणे असू शकतात.

कार विम्याचे दावे नाकारण्याची प्रमुख कारणे

कार विम्याचा दावा का नाकारला जातो याबद्दल आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते.कार इन्शुरन्स क्लेम नाकारण्याचे नेमकी काय कारणे असू शकतात ती पुढे आपण पाहुयात.

दारू पिऊन कार चालवल्यास

दारू पिऊन गाडी चालवणे हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही मद्यप्राशन केले असल्यास सरकार तुम्हाला वाहन चालविण्यास परवानगी देत ​​नाही. तसेच तुम्ही ड्रग्ज सेवन केले किंवा नशेत असाल आणि अशा परिस्थिती जर तुमच्या वाहनाचा अपघात झाला, तर तुमच्या विमा कंपनीला तुमचा कार विमा दावा नाकारण्याचा अधिकार आहे.

व्यावसायिक कारणांसाठी खासगी गाड्या वापरणे

तुमची कार व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यासाठी RTO कार्यालयात त्याची नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी संपूर्ण कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या आधारावर, तुमची विमा पॉलिसी देखील अपडेट करणे आवश्यक आहे. तथापि, जर तुम्ही तुमच्या खासगी कार व्यावसायिक कारणांसाठी वापरत असाल तर अशा वेळी तुमचा विमा दावा नाकारला जातो. त्यामुळे दावा दाखल करण्यापूर्वी तुमच्या विमा पॉलिसीमध्ये काय नमूद आहे ते पाहून घ्या.

निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास

कार विम्याचे दावे फक्त अपघात किंवा दुर्दैवी घटनांसाठी लागू केले जाऊ शकतात. ज्या प्रकरणांमध्ये स्वत:च्या निष्काळजीपणामुळे कारचे नुकसान झाले असल्यासदावा स्वीकारला जात नाही. त्यामुळे वाहन चालवताना प्रत्येकाने सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेऊन वाहन चालवणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या वाहनाच्या इंजिनमध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्यास तुम्ही ते दुरुस्त करून घ्यावे. जर तुमच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला तर कार विमा कंपनी तुमचा दावा पास करू शकत नाही.

इन्शुरन्स प्रीमियमचा अनियमित भरणा

तुमचा कार विमा सक्रिय ठेवण्यासाठी, तुमच्या विमा प्रीमियमनुसार वेळेवर पेमेंट करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या निवडलेल्या योजनेनुसार, हे मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक असू शकते. जर तुम्ही तुमचा विम्याचा हप्ता वेळेवर भरला नाही, तर तुमची कार विमा पॉलिसी रद्द किंवा नाकारली जाऊ शकते. या प्रकरणात कार विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते.

विमा कंपनीची दिशाभूल 

कार विम्याच्या दाव्यासाठी अर्ज करताना तुम्हाला अपघात किंवा घटनेबद्दल तपशील प्रदान करण्यास सांगितले जाते. जसे की तारीख, वेळ, स्थळ, अपघाताचा प्रकार, वाहन कोण चालवत होते? इत्यादी. मात्र, जर तुम्ही चुका केल्या किंवा ही माहिती बनावट दिली असेल तर विमा कंपनी तुमचा कार विमा दावा नाकारू शकते.

नियमांचे पालन न केल्यास

जेव्हा तुम्ही कार विमा पॉलिसी घेता तेव्हा तुम्ही कार विमा कंपनीशी एक प्रकारचा करार करत असता. या करारानुसार विमा कंपनीच्या नियमांचे पालन करणे तुम्हाला अनिवार्य आहे. समजा तुमच्या विमा कंपनीच्या नियमांमध्ये अपघानंतर निश्चित कालावधीमध्ये तुम्ही कपंनीला अपघाताची माहिती देणे गरजेचे असते. मात्र, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून नियमांची मर्यादा ओलांडल्यानंतर विम्याचा दावा केल्यास विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते. तसेच वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवताना नुकसान झाल्यास तुमचा दावा नाकारला जातो.

कार विमा पॉलिसी लॅप्स

शेवटी, कंपन्या तुमचा कार विमा दावा नाकारण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे तुमची कार विमा पॉलिसी संपली असल्यास. त्यामुळे तु्म्ही तुमची विमा पॉलिसी वेळेत रिन्यू करणे आवश्यक आहे.