Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

First Female SEBI Chairman: सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत?

First Female SEBI Chairman

Image Source : wwwurrentaffairs.adda247.com

First Female SEBI Chairman: भांडवली बाजार नियामक संस्थेसारख्या महत्त्वाच्या पदावर खासगी क्षेत्रातील महिलेची निवड होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सेबीचे तत्कालीन अध्यक्ष अजय त्यागी यांच्या जागी माधबी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली.

भांडवली बाजार नियामक संस्था म्हणजेच सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया्च्या (Securities and Exchange Borad of India-SEBI) पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्त होण्याचा मान माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांना मिळाला आहे. 2022 मध्ये केंद्र सरकारने माधबी पुरी बुच यांची SEBI चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. भांडवली बाजार नियामक संस्थेसारख्या महत्त्वाच्या पदावर खासगी क्षेत्रातील महिलेची निवड होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सेबीचे तत्कालीन अध्यक्ष अजय त्यागी यांच्या जागी माधबी यांची नियुक्ती करण्यात आली.

माधबी पुरी यांचा कार्य परिचय

माधबी पुरी यांनी आपल्या करिअरची सुरुवात आयसीआयसीआय बॅंकेतून (ICICI Bank) सुरू केली. 2009 ते 2011 पर्यंत त्या आयसीआयसीआय सिक्युरिटीजमध्ये एमडी आणि सीईओ (Madhabi Puri Buch, Former MD & CEO, ICICI Securities) म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्या सिंगापूरच्या ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल एलएलपीमध्ये रुजू झाल्या. माधबी यांनी यापूर्वी सेबीच्या माजी सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

माधबी पुरी बुच यांचे शिक्षण

माधबी पुरी या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाल्या आहे.त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM, Ahmadabad)मधून एमबीए केले. 2011 मध्ये त्या सिंगापूर गेल्या आणि तिथे त्या ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल LLP मध्ये सामील झाल्या.

अध्यक्ष म्हणून माधबी पुरी यांचा कार्यकाल किती असेल?

माधबी पुरी बुच यांची सेबीच्या अध्यक्षपदासाठी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. त्यांनी 1 मार्च, 2022 रोजी अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला आहे. मार्च, 2025 पर्यंत अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे सेबीचा कारभार असेल. 2017 पासून माधबी यांनी सेबीच्या पूर्ण वेळ सदस्य म्हणून सेबीचे माजी अध्यक्ष अजय त्यागी यांच्यासोबत काम केले आहे.


सेबी काय आहे?

सेबी (SEBI) ही भारतातील भांडवली बाजाराचे नियमन करण्यासाठी आणि सिक्युरिटीजमधील गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने स्थापन केलेली वैधानिक नियामक संस्था (Statutory Regulatory Body) आहे. सेबी ही संस्था भारतातील शेअर मार्केट, म्युच्युअल फंड (Share Market & Mutual Fund) आदी संस्थांच्या कार्याचे नियमन करते. वेगवेगळ्या प्रकारच्या गैरप्रकारांपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी आणि गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली. प्रामुख्याने खाली दिलेल्या तीन गटातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी सेबी सारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली.