हैदराबादमधल्या Naseer Khan या युवकाची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच हवा आहे. याचे कारण म्हणजे त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी McLaren 720S या अत्यंत महागड्या गाडीचा व्हिडियो शेयर केला होता. ही सुपर स्पेशल फीचर्स असलेली कार भारतात केवळ 4 लोकांकडे असून त्यांची किंमत 12 करोड इतकी आहे.
ब्रिटीश स्पोर्टकार बनविणाऱ्या McLaren कंपनीने मागील वर्षीच ही कार भारतात लाँच केली होती. भारतात केवळ मुंबईतच या कंपनीचे अधिकृत डीलरशीप असलेले शोरूम आहे.
McLaren 720S ही कार खरेदी केलेल्या नासीर खान या युवकाची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नासीर हा हैदराबाद येथील एक रिअल इस्टेट व्यावसायिक आहे. ती त्याच्या वडिलांचा पारंपारिक बिजनेस सध्या सांभाळतो आहे. हैदराबाद येथे किंग्ज ग्रुप ऑफ कंपनी (Kings Group of Company) नावाने त्यांची रिअल इस्टेट कंपनी रजिस्टर असून, या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी तेलंगाना राज्यात निवासी आणि व्यावसायिक बांधकाम केले आहे. मिडिया रिपोर्टनुसार नासीरच्या नावावर 83 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
37 वर्षीय नासीर खानला महागड्या कार्सचे कलेक्शन करण्याचा शौक आहे. त्याच्या सोशल मिडीया खात्यावर तो नेहमीच त्यांच्या कार्सचे फोटो आणि व्हिडीयोज शेयर करत असतो. त्याच्या कार्स कलेक्शनला त्याचे फॉलोअर्स दाद देताना दिसतात.
McLaren 720S या कारशिवाय नासीरकडे रॉयस कलिनन ब्लॅक बॅज (Rolls Royce Cullinan Black Badge) ही कार देखील आहे. याची किंमत अंदाजे 9 कोटी रुपये इतकी आहे. नुकतीच शाहरुख खानने देखील ही कार खरेदी केली आहे.
याशिवाय नासीरच्या कार्स कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ जी350डी (Mercedes-Benz G 350 d) ही कार असून त्याची किंमत अंदाजे 5 कोटी इतकी सांगण्यात येत आहे.
फोर्ड मस्टँग (Ford Mustang), लॅम्बोर्गिनी उरुस (Lamborghini Urus) , लैंबॉर्गिनी एवेंटाडोर (Lamborghini Aventador) आणि फेरारी 812 (Ferrari 812) या महागड्या गाड्या देखील आहे. या सगळ्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. नासीरकडे असलेल्या कार्सचे कलेक्शन 60 कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जाते.