Maharashtra Gramin Aawas Yojna: महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 नोव्हेंबर 2020 मध्ये ग्रामीण महाआवास योजनेची सुरुवात केली. ग्रामीण भागातील लोकांना पक्की घरे देण्याचा उद्देश पुढे ठेवून ही योजना सुरू करण्यात आली. वाढत्या महागाईमुळे अजूनही ग्रामीण भागातील अनेक लोकं मातीचे कच्चे घर बांधून राहतात. पावसामुळे अनेकांचे हाल होतात. या सर्व समस्यांचा सामना लोकांना करावा लागू नये, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
Table of contents [Show]
या योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
दिव्यांग सदस्य असलेली कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर अल्पसंख्याक प्रवर्गातील कुटुंबेही या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या कुटुंबांकडे कोणतेही मोटर वाहन, कृषी उपकरणे नाहीत, ज्या कुटुंबांकडे घर नाही, कच्चे घर आहेत असेही कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 19 ते 59 वयोगटातील प्रौढ नसलेली आणि किमान 25 वर्षे वयाचे साक्षर प्रौढ नसलेले कुटुंबही यासाठी पात्र आहेत. मजुरीकरुन उदरनिर्वाह करणारे कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- नरेगा जॉब कार्ड
- गृहनिर्माण संस्थेकडून एनओसी
- उत्पन्नाचा पुरावा
- प्रतिज्ञापत्र
ग्रामीण महाआवास योजना 2023 अर्ज
या वर्षीसाठी ही योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे अर्ज प्रक्रियेबाबत कोणतीही माहिती सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. सरकारकडून या योजनेची अर्ज नोंदणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जावू शकते, किंवा यासाठी विशिष्ट पोर्टलसुद्धा सुरू केले जाऊ शकते.
महाआवास अभियान ग्रामीण ऑफलाइन नोंदणी
महाराष्ट्र ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत ऑफलाइन अर्ज करण्यासाठी संबंधित विभाग किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधू शकतात. अर्जदारांनी MAY-G अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज ग्रामपंचायतीकडून मिळू शकतात. ग्रामसभेने तयार केलेल्या यादीतून लाभार्थ्यांची निवड केली जाते. MAYG साठी नोंदणी प्रक्रियेमध्ये चार विभाग असतात, ज्यात पर्सनल डिटेल्स, बँक खाते डिटेल्स, संबंधित कार्यालयातील डिटेल्स दिले जातात. योजनेतील ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सारखीच असू शकते.