Big decision of Ola company to close the languishing business permanently: कॅब सर्व्हिस व्यवसाय या शाखेत येणारी ओला ही कंपनी, सध्या त्यांच्या ईलेक्ट्रीक बाईकमुळे चर्चेत आहे. ई-बाईक इंडस्ट्रीमध्ये ओला कंपनीचा 30 टक्के हिस्सा आहे. 2022 वर्षात त्यांनी एकूण 25 हजार गाड्या विकल्या. ज्यामुळे ही देशातील सर्वाधिक ई-बाईक विकणारी कंपनी ठरली आहे. येत्या काळात ओला आणखी नवतंत्रज्ञानयुक्त बाईक लाँच करणार आहेत. मात्र ओला कंपनीने त्यांच्या व्यवसायाची सुरुवात ऑनलाईन टॅक्सी बुकींगपासून केली होती. त्यानंतर ओलाच्या अंतर्गत अनेक व्यवसाय सुरू केले होते, त्यापैकीच एक ई-बाईक हे आहे. मात्र इतर व्यवसायात तोटा झाल्यामुळे ओलाने 2022 वर्षात ते व्यवसाय बंद केले आहेत. नेमके कोणते व्यवसाय ओलाने बंद केले ते पाहुयात.
मुंबईत 2010 साली भविष अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी ओला या स्टार्टअप कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीअंतर्गत ते प्रवाशांना टॅक्सीसाठी ऑनलाईन बुकिंग करण्याची सेवा देत होते, कॅब पुरवण्याची सेवाही देत होते. त्यांनी स्वत:च्या कार घेतल्या होत्या तर काही टॅक्सी धारकांना आपल्या कंपनीअंतर्गत काम दिले होते. या व्यवसाय यशस्वी झाला. पुढे त्यांनी यात टॅक्सीसह, रिक्षा, बाईकही आणल्या. 2015 पर्यंत त्यांनी हाच व्यवसाय मोठा केला.
ओला कंपनीने नेमके कोणते व्यवसाय बंद केले? (Which businesses did Ola shut down?)-
2015 नंतर कंपनीने विविध क्षेत्रात स्वत:ला आजमावण्याचा प्रयत्न केला. यात मुख्यत्त्वे त्यांनी फूड इंडस्ट्रीची परेड केली. पहिले तर ओलाने ओला कॅफे सुरू केला. यात त्यांनी काही ओला कॅफे हे फूड ट्रक्समध्ये सुरू केले. मुंबईतील ठराविक ठिकाणी पायलेट प्रोडक्ट सुरू केले. मात्र लॉकडाऊनमध्ये सर्वकाही बंद झाले होते. त्यानंतर या कॅफेजना नवसंजिवनी देणे कंपनीला शक्य न झाल्यामुळे त्यांनी हा कॅफेचा व्यवसाय बंद केला.
2017 साली ओला कंपनीने फूडपांडा या फूड डिलिव्हरी कंपनीला खरेदी केले. ही झोमाटो आणि स्विगीच्या शाखेतील कंपनी, त्यांच्याप्रमाणेच या कंपनीचा व्यवसाय सुरू होता. फूडपांडाचे नामकरण करून त्याला ओला फूड्स असे नाव देण्यात आले होते. ओला फूड्सच्या अंतर्गत विविध रेस्टॉर्ंट्स, हॉटेल्स, फूड जॉईंट्सशी टायअप करण्यात आले होते. मात्र झोमाटो, स्विगी आणि ईडशुअर यांच्या प्रभावाममुळे, मार्केटींग स्ट्रॅटेजीमुळे ओला फूड्सला ग्राहकांनी पाठ दाखविली आणि अखेर कंपनीला ओला फूड्स बंद करावे लागले.
2019 मध्ये ओला कंपनीने ओला डॅश नावाने क्विक कॉमर्स व्वयवसाय सुरू केला होता. या व्यवसायातही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट तर दुसरीकडे ग्रोफर्स, बिग बास्केट सारखे ब्रँड्स होते. या सगळ्यात ओला डॅशला तग धरता आला नाही. यामुळेच कंपीनीला हा व्यवसायही बंद करावा लागला.
ओलाने 2015 पूर्वी ओला कारस् म्हणून एक व्यवसाय सुरू केला होता. यात ते कार विकणे, सेंकड हँड कारशी निगडीत व्यवहार केले जात होते. हा व्यवसाय काही काळ चांगला चालला. त्यांनी देशातल्या पाच शहरांमध्ये याचे सेंटर उघडले होते, मात्र नंतर मार्केटींगची कमी, ऑपरेशनमधील अडचणी यामुळे हा व्यवसायही डबघाईल आला, त्यामुळे हा व्यवसायालाही टाळे मारावे लागले.
ओला कंपनीने त्यांच्या 2022 च्या वार्षिक अहवालात हे सर्व व्यवसाय अधिकृतरित्या बंद करत असल्याचे नमूद केले आहे.