Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Vs Real Estate: लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय योग्य? म्युच्युअल फंड की रिअल इस्टेट!

Mutual Fund Vs Real Estate, Best Option?

Image Source : www.blackenterprise.com

Mutual Fund Vs Real Estate: गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड की रिअल इस्टेट या दोन्हीमधून एकाची निवड करताना आपण किती जोखीम स्वीकारू शकतो. तसेच आपली आर्थिक उद्दिष्ट्ये काय आहेत आणि आपल्या गुंतवणुकीची दिशा अत्यंत विचारपूर्वक ठरवली पाहिजे.

Mutual Fund Vs Real Estate: गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड की रिअल इस्टेट (Real Estate) या दोन्हीमधून एकाची निवड करताना आपण किती जोखीम स्वीकारू शकतो. तसेच आपली आर्थिक उद्दिष्ट्ये काय आहेत आणि आपल्या गुंतवणुकीची दिशा अत्यंत विचारपूर्वक ठरवली पाहिजे.

दीर्घकालीन गुंतवणूक करताना गु्ंतवणूकदारांना नेहमीच प्रश्न पडतो की, कोणत्या पर्यायातून चांगला आणि सुरक्षित परतावा मिळेल. त्यात म्युच्युअल फंड (Mutual Fund) आणि रिअल इस्टेट (Real Estate) यामधील एकाची निवड करायची असेल तर ते अजूनच किचकच वाटू शकते. कारण म्युच्युअल फंडमधील दीर्घकालीन गुंतवणुकीतून आतापर्यंत नक्कीच चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळत आला आहे. पण त्या तुलनेत रिअल इस्टेटमध्ये जी ग्रोथ होते. तेवढी ग्रोथ मिळवण्यासाठी म्यु्च्युअल फंडमध्ये खूप काळ गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे साहजिकच लोकांचा पहिला कल हा रिअल इस्टेटला असल्याचे दिसून येते. किमान भारतातील गुंतवणूकदारांचा हाच कल दिसून येतो.

रिअल इस्टेटमधील जोखीम समजून घेणे गरजेचे!

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मतेही, म्युच्युअल फंडापेक्षा रिअल इस्टेटमधील दीर्घकालीन गुंतवणूक ही फायद्याची ठरू शकते. पण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना त्यातील जोखीम आणि अडचणी लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीत मोठी रक्कम गुंतवावी लागते. तसेच खरेदी केलेल्या प्रॉपर्टीच्या सुरक्षिततेसाठी, दुरूस्तीसाठी पुन्हा पैसे खर्च करावे लागतात. त्याशिवाय मार्केट रिअल इस्टेटला कशाप्रकारे प्रतिसाद देत आहे. हे सुद्धा पाहावे लागते. नाहीतर काहीवेळेस नुकसान सहन करावे लागते. तर काहीवेळेस योग्य किंमत मिळेपर्यंत वाट पाहावी लागते.

म्युच्युअल फंडमधील परतावा पूर्णत: मार्केटवर अवलंबून

रिअल इस्टेटच्या तुलनेत म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसाठी खूप मोठी रक्कम गुंतवावी लागत नाही. एकदा गुंतवणूक केली की, त्याची देखभाल दुरुस्ती किंवा इतर खर्चिक गोष्टी कराव्या लागत नाहीत. पण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही पूर्णत: मार्केटच्या कामगिरीवर अवलंबून असते. त्यातून गुंतवणूकदाराला लाभ किंवा नुकसान काहीही होऊ शकते. रिअल इस्टेटमध्ये मात्र प्रॉपर्टीची किंमत कमी झाली तरी तिचा वापर करता येतो. उपभोग घेता येतो. जी प्रॉपर्टी भाड्याने देऊन त्यातून किमान उत्पन्न मिळवता येते. हे लाभ म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतून घेता येत नाही.

याशिवाय रिअल इस्टेटमधील दीर्घकालीन गुंतवणुकीतून भांडवली नफ्यावरील टॅक्समध्ये सवलत मिळवण्याची तरतूददेखील आहे. म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतही ही तरतूद आहे. त्यामुळे या दोन्ही पर्यायांपैकी एका पर्यायात गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदाराने अधिकृत वित्तीय सल्लागाराची मदत घेऊनच गुंतवणूक करावी.