Mobiles used in rural areas: ग्रामीण भागात सर्वाधिक शेती आणि मजुरी करणारे लोक राहतात. सकाळी उठून त्यांना शेतातील कामे करावी लागत असल्याने त्यांना स्टाइल या शब्दाचे जास्त आकर्षण नसते. बाइक असो की मोबाइल ते सर्वात आधी कमी किमतीत सर्वाधिक फीचर्स असेल असेच मॉडेल शोधतात. ग्रामीण भागात जशी होंडा जास्तीत जास्त लोकांजवळ आढळून येते त्याचप्रमाणे मोबईलमध्ये रेडमी, मोटो आणि रियलमी या कंपनीचे मोबाइल फोन जास्तीत जास्त आढळून येतात.
Table of contents [Show]
कमी किमतीत स्ट्रॉंग आणि उत्कृष्ट फीचर्स असलेले मोबाइल (A mobile with strong and excellent features at a low price)
ग्रामीण भागातील लोकांना शेतात वादळ पाऊस या सगळ्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर दिवस शेतात काम करावे लागत असल्याने नेहमी नेहमी चार्जिंग सुद्धा करू शकत नाही त्यामुळे त्यांची पसंती ही कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स देणाऱ्या मोबाइलकडे असते. कमी किमतीत स्ट्रॉंग आणि उत्कृष्ट फीचर्स असलेले मोबाइल खालीलप्रमाणे.
Infinix Smart HD 2021
6.1-इंचाच्या IPS HD+ डिस्प्लेसह लॉन्च करण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720x1560 पिक्सेल आहे आणि त्याची कमाल ब्राइटनेस 500nits आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 8MP सिंगल कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे.
- मेमरी 2GB रॅम, 32GB
- स्टोरेज डिस्प्ले 6.1″ (720 x 1560) स्क्रीन
- 282 PPI कॅमेरा 8 + 8 MP ड्युअल रियर कॅमेरा, 5 MP फ्रंट कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंगसह
- बॅटरी 5000 mAh बॅटरी आणि USB पोर्ट सिम ड्युअल सिम वैशिष्ट्ये एलईडी फ्लॅश
- किंमत 6,499
Redmi 9A
फोनमध्ये 6.53-इंचाचा IPS डिस्प्ले आहे आणि त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. फोनला Aura 360 डिझाइन देण्यात आले आहे आणि तो Unibody 3D डिझाइनसह येतो. डिव्हाइस MediaTek Helio G25 प्रोसेसर आहे.
- प्रोसेसर MediaTek Helio G25 ऑक्टा-कोर प्रोसेसर (2.0 GHz)
- मेमरी 4GB रॅम, 128GB स्टोरेज
- डिस्प्ले 6.53″ (720 x 1600) स्क्रीन, 267 PPI
- कॅमेरा 13 + 2 MPDual रियर कॅमेरा, 5 MP फ्रंट कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंगसह
- बॅटरी जलद चार्जिंग आणि USB टाइप-सी पोर्टसह 5000 mAh बॅटरी
- किंमत 7,280
Realme C2
मोबाइल फोन HD+ रिझोल्यूशन स्क्रीनसह 6.1-इंच ड्यूड्रॉप नॉचसह येतो.
- प्रोसेसर MediaTek Helio Octa core (2 GHz)
- मेमरी 3GB रॅम, 32GB स्टोरेज
- डिस्प्ले 6.1″ (720 x 1520) स्क्रीन
- कॅमेरा 13 + 2 MPDual रियर कॅमेरा, 5 MP फ्रंट कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंगसह
- बॅटरी 4000 mAh बॅटरी
- किंमत 7,499
ग्रामीण ज्याप्रमाणे शेतकरी आणि मजुरी करणारे लोक राहतात, त्याचप्रमाणे विविध उच्च पदावर असलेले व्यक्ती, विद्यार्थी सुद्धा राहतात. त्यांची पसंती नक्कीच हे साधे मोबाइल राहणार नाही. म्हणून ग्रामीण भागात नेमके हेच मोबाइल जास्त वापरले जातात असे आपण म्हणू शकत नाही. काही महिला अजूनही कीपॅडचे साधे मोबाइल वापरतात.