Four-Wheeler Companies Sale: मे महिना हा फोर व्हीलर्सची विक्री करणाऱ्या कंपन्यांसाठी प्रचंड नफा मिळवून देणारा महिना ठरला आहे. मे महिन्यात चारचाकी वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. मे महिन्यात विविध कंपन्यांनी एकूण 3,34,800 चारचाकी प्रवासी वाहने डीलर्सकडे पाठवली आहेत.
Table of contents [Show]
मारुती सुझुकीची विक्री किती?
ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने मे महिन्यात एकूण 1,43,708 युनिट्स मार्केटमध्ये पाठविल्या आहेत. Maruti Suzuki कंपनी एसयूव्ही सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करीत असतानाच, इलेक्ट्रॉनिक घटकांशी संबंधित काही त्रुटींमुळे कंपनीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. Maruti Suzuki च्या फ्रॉन्क्स मॉडेलला बाजारात पसंत केले जात आहे. कंपनीने मे महिन्यात आपला शेअर मार्केटमधील हिस्सा 1 टक्क्यांनी वाढवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीकडे सध्या 3,65,000 युनिट्सच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.
Hyundai आणि Creta मॉडेल्सची उत्तम विक्री
Hyundai कंपनीने मे महिन्यात जवळपास 48601 युनिट्सटी जबरदस्त विक्री केली. मे महिन्यात Hyundai कंपनीच्या विक्रीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अंतर्गत कंपनीने SUVs Hyundai Venue आणि Hyundai Creta ची जबरदस्त विक्री केली. त्याचप्रमाणे कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या Hyundai Verna वाहनाची देखील जबरदस्त विक्री झालेली आहे.
Tata Motors ची मे मधील विक्री
Tata Motors कंपनीने मे महिन्यात 45,878 युनिट्सच्या विक्रीत 6 टक्के वाढ नेंदवली आहे. मात्र, या महिन्यात टाटा मोटर्सला व्यावसायिक वाहन क्षेत्रात काही प्रमाणात तोटा सहन करावा लागला. व्यावसायिक वाहनांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, Tata Motors कंपनीने मे महिन्यात 12 टक्क्यांच्या घसरणीसह 27,570 मोटारींची विक्री केली आहे.
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची विक्री
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या SUV मॉडेलला मे महिन्यात प्रचंड मागणी होती. मे महिन्यात कंपनीने 32,886 गाड्यांची विक्री केली. परंतु, अद्यापही कंपनी फोर व्हीलर्समधील काही तांत्रिक गोष्टींचा सामना करीत आहे.
Kia India कंपनीची विक्री
Kia India कंपनीने मे महिन्यात एकूण 1,87,666 फोर व्हीलर्सची विक्री केली. या कंपनीने मे महिन्यात आपला कारखाना 1 आठवड्यासाठी बंद ठेवला होता. ज्याचा कंपनीच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले.
टोयोटा किर्लोस्कर कंपनीची विक्री
टोयोटा किर्लोस्करने मे महिन्यात एकूण 20,410 युनिट्सची विक्री केली. मे 2022 मध्ये कंपनीने एकूण 10,216 युनिट्सची विक्री केली होती.