Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Housing Price Hike: नवं घर घेणं आणखी महाग! देशातील प्रमुख शहरांमध्ये सदनिकांच्या किमती वाढल्या

Housing Price Hike

Image Source : www.newsclick.in.com

भारतातील प्रमुख शहरांमध्ये नवं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली नाही. कारण मुंबई, हैदराबाद, बंगळुरु सारख्या प्रमुख शहरांमधील सदनिकांच्या किंमतीमध्ये 5 ते 7% टक्के वाढल्या आहेत. ही दरवाढ नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाही म्हणजेच जानेवारी-मार्च कालावधीत नोंदवली गेली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात सतत वाढ करण्यात येत आहे.

Housing Price Hike: भारतातील प्रमुख शहरांमध्ये नवं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली नाही. कारण मुंबई, हैदराबाद, बंगळुरू सारख्या प्रमुख शहरांमधील सदनिकांच्या किंमती 5 ते 7% टक्के वाढल्या आहेत. ही दरवाढ नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाही म्हणजेच जानेवारी-मार्च कालावधीत नोंदवली गेली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात सतत वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे गृहकर्जाच्या व्याजदरात मागील वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. दरवाढ होत असली तर आलिशान घरांची मागणी कमी झालेली नाही.

नाइट फ्रँक इंडिया या संस्थेने याबाबची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमतीत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी-मार्च या मागील आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीतील ही आकडेवारी आहे.

प्रमुख शहरात किंमती वाढल्या

बंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद शहरांत घरांच्या किंमती 5 ते 7% वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. (Housing Price Hike) ही वाढ सरासरी आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही बंगळुरू शहरात 50 लाख रुपयांचे घर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये जास्त द्यावे लागतील. असे असतानाही घरांची मागणी कमी झालेली नाही. काही शहरांमध्ये मागणी स्थिर किंवा किंचित वाढली आहे. हैदराबाद शहरात घरांची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत 19% वाढली. तर मुंबई आणि बंगळुरू शहरामध्ये अनुक्रमे 6 आणि 2% मागणी वाढली.

घरांची विक्री किंमतीनुसार किती?

2022-23 आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यांतही सदनिकांची बाजारातील मागणी चांगली होती. 1 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तांची विक्री 25% वरून 29% वर गेली आहे. मोठे घर आणि सुविधा काय मिळतात याकडे आलिशान घर खरेदीदार पाहतात. तर 50 लाख ते 1 कोटी दरम्यान किंमत असणाऱ्या घरांची विक्री 38 टक्क्यांनी वाढली आहे. मागील आर्थिक वर्षात ही वाढ 35% होती.

दरम्यान, परवडणाऱ्या श्रेणीतील घरांची मागणी तुलनेने कमी राहिली. मागील वर्षी या श्रेणीमध्ये 41% वाढ झाली. मात्र, ही वाढ आता 32% वर आली आहे. घरांच्या वाढत्या किंमती आणि चढ्या व्याजदरामुळे सर्वसामान्य नागरिकांनी घर खरेदीकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. कोरोनामुळे नागरिकांच्या उत्पन्नावर झालेला परिणामही महत्त्वाचा घटक ठरत आहे. हातातील खेळता पैसा कमी झाल्याने गुंतवणूक करण्याची क्षमता कमी झाली आहे.

व्याजदर वाढीस सर्वसामान्य नागरिक संवेदनशील असतो. मागील वर्षी मे पासून रेपो रेट 2.5% वाढला आहे. तसेच स्थावर मालमत्ता हे क्षेत्र अर्थव्यवस्थेतील 260 छोट्यामोठ्या घटकांशी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या जोडले गेले आहे. त्यामुळे याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झाला आहे. पुढील पतधोरण बैठकीत आरबीआय ही बाबही लक्षात घेईल, असे National Real Estate Development Council (NAREDCO) च्या महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष संदीप रुनवल यांनी म्हटले.

कोणत्या गृहप्रकल्पांना जास्त पसंती?

पूर्वी एखादा गृहप्रकल्प विकसित होत असताना मध्येच काम बंद होऊन प्रकल्प बारगळण्याची भीती खरेदीदारांना असे. त्यामुळे तयार किंवा शेवटच्या टप्प्यातील घर खरेदीकडे ग्राहकांचा कल असे. मात्र, सतत मागणी वाढत असल्याने तयार घरांची संख्या कमी झाली आहे. तसेच दरवाढही झाल्याने आता खरेदीदार नव्याने लाँच झालेल्या प्रकल्पात गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. नुकतेच लाँच झालेल्या प्रकल्पात तुलनेने स्वस्त घर बुक करता येते.