Cotton production: कापूस लागवडीच्या वेळी शेतकरी अत्यंत चिंतेत होता कारण पाऊस आधी पाऊस आलेला नव्हता आणि आणि मग 15 दिवस पावसाने रिपरिप लावली होती. पण सध्या शेतकरी समाधानी आहे कारण या वर्षी कापूस बऱ्यापैकी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेच्या कृषि विभागाने (US Department of Agriculture) केलेल्या संशोधनातून असे लक्षात आले की, चीन, भारत, ब्राझील (China, India, Brazil) या देशांमध्ये कापूस उत्पन्न समाधानकारक असणार आहे. तर जाणून घेऊया कोणत्या देशात कापूस उत्पादनात घट (Decline in cotton production) झाली आहे आणि कोणते देश कापूस उत्पन्न सर्वाधिक घेणार आहे.
भारत आणि चीनमधील कापूस लागवड (Cotton cultivation in India and China)
मागील हंगामात चीनमध्ये कापसाचा तुडवडा होता, त्यामुळे तिथे कापसाला हवा तसा दर मिळत होता. त्यानंतर तिथे लागवड वाढवण्यात आली आणि आता कापूस उत्पन्न वाढले. भारतात सुद्धा कापूस लागवड वाढली आणि उत्पादन सुद्धा वाढणार आहे, अशी शक्यता USDA ने व्यक्त केली आहे. चीनचा कापूस वापर वाढून 444 लाख गाठींवरून 450 लाख गाठीवर पोहचू शकतो तर भारतातील कापूस उत्पादन 317 लाख गाठींवरून 212 लाख गाठींवर थांबेल असा अंदाज आहे.
कोणकोणत्या देशात उत्पादनावर फटका बसला? (In which country was production affected?)
अमेरिका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये (America, Pakistan and Australia) या वर्षी कापूस उत्पादन कमी असेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषि विभागाने व्यक्त केला आहे. अमेरिकेमध्ये मागील हंगामात 222 लाख गाठी कापूस उत्पादन होते ते आता 180 लाख गाठी आहे आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये 73 लाख वरुन 63 लाख गाठी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला पुराचा मोठा फटका बसल्याने या वर्षी 29 लाख गाठी कापूस घटणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
USDA चा भारतातील अंदाज खोटा ठरणार का? (Will USDA's forecast for India be wrong?)
USDA नुसार या वर्षी भारतात कापूस लागवड जास्त असल्याने उत्पन्न सुद्धा समाधानकारक होणार, गुलाबी बोंड अळी सुद्धा नसल्याने कापूस उत्पन्न भारतात भरपूर होणार. पण शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाहिजे तसे उत्पन्न नाही. त्यामुळे USDA चा अंदाज खोटा ठरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.