Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Furniture on Rent Pune: भाड्याने घर घेऊन राहताय? मग फर्निचरही भाड्याने घ्या, घर बदलताना नो टेन्शन!

Funiture on Rent Pune

तात्पुरती गरज भागवण्यासाठी जर तुम्हाला घरगुती वस्तू हव्या असतील तर विकत घेण्याची गरज नाही. तुम्ही फर्निचर आणि घरगुती उपकरणे भाड्याने घेऊ शकता. वस्तू वापरून झाल्यावर पुन्हा माघारी करता येईल. नोकरी, कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर भाड्याच्या घरात राहत असाल तर फर्निचर ऑन रेंट तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

Furniture on Rent Pune: नोकरी व्यवसायानिमित्त अनेकांना एकापेक्षा जास्त शहरांत काही महिने किंवा वर्षासाठी राहण्याची वेळ येते. फक्त नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांनाच नाही तर कॉलेज, कोर्सेस किंवा इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही घरापासून दूर रहावे लागते. अशा वेळी सहाजिकच भाड्याने फ्लॅट घेऊन रहावे लागते. तात्पुरत्या गरजेसाठी मग महागडे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत न घेता भाड्याने वापरता येतील.  

ऑनलाइन साटइद्वारे करू शकता ऑर्डर 

पुणे, मंबई, दिल्ली, बंगळुरूसह मोठ्या मेट्रो शहरांमध्ये भाड्याने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू देणाऱ्या अनेक ऑनलाइन साइट्स आहेत. या साइट्सवरून तुम्ही फर्निचर रेंटने घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तेवढे महिने वापरून पुन्हा माघारी करता येईल. टेबल, सोफा, चेअर, फॅन, कूलर, एसी यासह शेकडो वस्तू आणि त्यांचे महिन्याचे भाड्याचे दर तुम्हाला ऑनलाइन पाहायला मिळतील. 

वस्तू घेताना अनामत रक्कम द्यावी लागू शकते. 20-25 हजार रुपयांचा सोफा किंवा बेड विकत घेण्यापेक्षा दरमहा तात्पुरत्या वापरासाठी भाड्याने घेऊन वापरता येईल. तसेच गरज संपल्यानंतर वस्तू माघारी करता येईल. 

पैसे वाचवण्यासाठी फर्निचर भाड्याने घ्या 

तात्पुरती गरज असताना तुम्ही नवीन फर्निचर घेतले तर घर सोडताना पंचाईत होऊन बसते. एका शहरातून दुसऱ्या शहरात सामान नेताना वाहतूक खर्च सामानापेक्षा जास्त होऊ शकतो. किंवा ऐनवेळी सामान विकायची वेळ आली तर चांगली किंमत मिळण्याची शक्यता कमी. तोटा करून घेण्यापेक्षा फर्निचर भाड्याने घेणे उत्तम ठरेल. ऑनलाइन साइट्सबरोबर लोकल मार्केटमध्ये तुम्ही फेरफटका मारला तरी फर्निचर भाड्याने देणारी दुकाने मिळतील. कमीत कमी भाड्यामध्ये जेथे वस्तू मिळतील तेथून तुम्ही घेऊ शकता. 

Furlenco ऑनलाइन फर्निचर वेबसाइट

फर्लेनको या ऑनलाइन साइटद्वारे तुम्ही पुणे आणि आघाडीच्या मेट्रो शहरात राहत असाल तर फर्निचर भाड्याने ऑर्डर करू शकता. सोफा, टेबल, कपाट, चेअर, एसी, कूलर, फॅन सह इतरही अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तू तुम्ही ऑर्डर करू शकता. प्रत्येक वस्तूसाठी दरमहा भाडे किती हे तुम्ही पाहू शकता.

सध्या Furlenco कडून डिस्काउंट देण्यात येत आहे. तुम्ही जर भाड्याने फर्निचर घेत असाल तर दीड हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळेल. (Furniture on Rent) तसेच संपूर्ण घर फुल्ली फर्निश फक्त 3,599 दरमहा भाडे भरून करू शकता. यात सोफा, कपाट, टेबल, खुर्ची असे सामान आहे. 6 हजार रुपयांपर्यंत मासिक प्लॅन आहेत. ज्याद्वारे तुम्ही 15 पेक्षा जास्त वस्तू भाड्याने घेऊ शकता. असे सब्स्क्रिप्शन प्लॅनही घेता येतील.

bhadepay ऑनलाइन फर्निचर साइट 

भाडेपे या ऑनलाइन साइटवरून तुम्ही फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणे ऑर्डर करू शकता. कपडे ठेवण्याचे कपाट 250 रुपये महिना या दराने भाड्याने घेऊ शकता. (how to rent Furniture in Pune)  सिंगल बेड 250, डबल बेड 350 रुपये भाड्याने घेऊ शकता. डबल बेडसाठी गादी 250 रुपये महिना या दराने भाड्याने मिळू शकते. वस्तूनुसार किंमती बदलू शकतात. तीन व्यक्तींसाठी सोफा 500 रुपये महिना भाड्याने मिळू शकतो.

घरपोच फर्निचर मिळेल 

तुम्ही भाड्याने घेतलेली वस्तू विकतही घेऊ शकता. आधी भरलेले भाडे वजा करून ती वस्तू तुम्ही विकत घेऊ शकता. ऑर्डर केल्यानंतर फर्निचर तुम्हाला घरपोच मिळेल. अनेक साइट्स ही सुविधा देतात.  

सब्स्क्रिप्शन मॉडेल

तीन, सहा, नऊ, बारा महिन्यांचा कालावधी निवडू शकता. त्यासाठीचे पैसे तुम्ही ऑनलाइन भरू शकता. कालावधीचे पैसे वस्तू भाड्याने घेताना आधीच भरावे लागतील. रिफंडेबल डिपॉझिट वस्तू घेताना द्यावे लागेल. 

ऑनलाइन फर्निचर भाड्याने घेण्यासाठी साइट्स कोणत्या?

यासोबत सिटी फर्निश, नो ब्रोकर फर्निचर, रेंटटिकल, रेंटट्रिप, रेंटवन अशी अनेक संकेतस्थळे आहेत. ज्याद्वारे तुम्ही ऑनलाइन फर्निचर भाड्याने घेऊ शकता. सर्वात कमी भाड्यामध्ये चांगली वस्तू मिळण्यासाठी विविध साइटशी तुलना करता येईल. तसेच पेमेंट आणि नियमही बारकाईने वाचून घ्या. वस्तूची मोडतोड झाल्यास अनामत रक्कम किती कापून घेतील जाते. सब्स्क्रिप्शन संपल्यावर पैसे ऑनलाइन खात्यातून कट होतात का? ही सर्व माहिती घेतल्यानंतरच फर्निचर भाड्याने घ्या.