Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Debit freeze: बँक खाते कोणत्या परिस्थितीत गोठवले जाते? डेबिट फ्रीज म्हणजे काय?

Debit freeze

Image Source : www.dnaindia.com

बँक खाते गोठवल्यानंतर तुम्हाला कोणतेही व्यवहार करता येत नाहीत. कोणत्या कारणांमुळे तुमचे खाते गोठवले म्हणजेच फ्रिज केले जाऊ शकते. असे बंद केलेले खाते पुन्हा सुरू करता येते का? जाणून घ्या.

Debit freeze Account: भारतात खासगी, सार्वजनिक आणि बिगर वित्तसंस्थामध्ये कोट्यवधी नागरिकांची बँक खाती आहेत. चालू, बचत आणि विविध प्रकारची ही खाती आहेत. मात्र, जर खात्यातून, बेकायदेशीर, असंदिग्ध व्यवहार झाले किंवा KYC अपडेट केली नाही तर तुमचे खाते गोठवले जाऊ शकते.

बँक खाते गोठवणे म्हणजे काय?

जेव्हा तुमचे बँक खाते गोठवले जाते तेव्हा तुम्हाला खात्यातून पैसे काढता येत नाहीत किंवा जमा सुद्धा करता येत नाही. तुमचे खाते पूर्णपणे निष्क्रिय होते. बँक ग्राहकाचे खाते गोठवता त्याला नोटीस पाठवते. खाते गोठवण्यामागील कारण यामध्ये दिलेले असते.  

खाते फ्रीज करण्यामागील कारणे काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2016 साली एक पत्रक जारी केले होते, त्यानुसार जे ग्राहक बँकेकडे पॅन कार्ड किंवा Form-16 जमा करणार नाहीत. अशा ग्राहकांची खाती गोठवण्यात यावीत. मात्र, बँक खाते गोठवण्याआधी ते दोन नियमांत बसायला हवे.

बँक खात्यातील रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त असावी.

9 नोव्हेंबर 2016 नंतर खात्यात दोन लाख रुपये ऑनलाइन किंवा इतर कोणत्याही पद्धतीने जमा झालेले असतील, तर अशी खाती गोठवण्याचे आदेश देण्यात आले होते. PAN आणि फॉर्म 16 दिल्यानंतरच अशी खाती सुरू होऊ शकतात. 

खाते गोठवले जाण्यामागील इतर कारणे

तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंग संबंधीत, किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींसाठी पैशांचे व्यवहार झाले तरी खाते गोठवले जाऊ शकते. 

तसेच बँक खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाल्यास किंवा परदेशातून मोठ्या रकमेचे खरेदी, ट्रान्सफरचे व्यवहार बँकेला आढळून आल्यास बँक खाते गोठवू शकते. 

सलग दोन वर्ष कोणतेही व्यवहार खात्यावरून न झाल्यास बँक खाते निष्क्रिय करते. (bank Account gets Frozen)अशा खात्यास डॉर्मन्ट अकाउंट म्हटले जाते. या खात्यावरून सुद्धा व्यवहार करता येत नाही. मात्र, खाते गोठवण्यापेक्षा निष्क्रिय खाते असणे वेगळे आहे. 

खाते गोठवण्याचा अधिकार कोणाला आहे?

खाते गोठवण्याचा अधिकार सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड(सेबी) आयकर विभाग, सक्तवसुली संचलनालय, न्यायालये आणि काही परिस्थितीत बँकांना देखील आहेत. ही गोठवलेली खाती संबंधीत खात्याच्या परवानगीशिवाय पुन्हा सुरू करता येत नाहीत. न्यायालयही खाते गोठवण्याचा किंवा गोठवलेले खाते सुरू करण्याचा आदेश देते.  

फ्रीज केलेले खाते सुरू करता येते का?

जर तुमचे खाते गोठवले तर ते पुन्हा सुरू करता येऊ शकते. मात्र, त्यामागे कोणते कारण आहे ते महत्त्वाचे आहे. जर केवायसीमुळे खाते बंद करण्यात आले असेल तर तुम्ही बँकेत जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करून खाते अनफ्रिज करू शकता. 

मात्र, बेकायदेशीर आणि संदिग्ध व्यवहारांमुळे बँक खाते गोठवण्यात आले असेल तर अशी खाती कायमची बंद होऊ शकतात. या खात्यातील रक्कम सरकार दरबारी जमा होते. मोठ्या कर्जप्रकरणातील फरारी व्यक्ती, मनी लाँड्रिगमध्ये गुंतलेल्या अनेक उद्योगपतींची खाती सरकारने याआधी गोठवली आहेत.