Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shah Rukh Khan: बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खान 6000 कोटींचा मालक, 'या' सोर्समधून कमावतो वर्षाला कोट्यवधी रुपये

Shah Rukh Khan

SRK: जगातील सगळ्यात महागड्या कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे शाहरुख खान. एक कलाकार म्हणून तो सगळ्यांनाच परिचित असला तरी तो अभिनयाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही कार्यरत आहे. या लेखात जाणून घेऊया त्याच्या संपत्तीचे विविध स्त्रोत आणि त्याची वार्षिक कमाई!

शाहरुख खान या नावाला ओळखीची गरज नाही. आज देशात आणि जगात शाहरुखचे करोडो चाहते आहेत. 57 वर्षीय शाहरुख आजही तरुण वर्गाला आकर्षित करताना दिसतो. शाहरुख खान जितका चाहत्यांच्या प्रेमाने श्रीमंत झालाय तितकीची पैशांची श्रीमंती देखील त्याने कमावली आहे. चला तर जाणून घेऊयात बॉलीवूडचा किंग शाहरुख खानच्या संपत्तीविषयी!

शाहरुख खान केवळ अभिनयातून पैसे कमावतो असे नाही. त्याची उत्पन्नाची साधने अनेक आहेत. वेगवगेळ्या स्त्रोतातून तो पैसा कमावतो आहे. ब्रांड एंडोर्समेंट, व्यावसायिक गुंतवणूक, क्रीडा संघाची मालकी, जाहिराती, सामाजिक कार्यक्रम आदी गोष्टीतून तो पैसा कमावतो. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार शाहरुख खानची सरासरी वार्षिक कमाई ही  $38 दशलक्ष इतकी आहे, भारतीय रुपयांत याचा हिशोब केला तर अंदाजे ₹ 284 कोटी रुपयांची वार्षिक कमाई शाहरुख करतो असे म्हणता येईल. म्हणजेच शाहरूखची दिवसाची सरासरी कमाई आहे तब्बल 78 लाख!

आता कोणकोणत्या मार्गाने शाहरुख पैसे कमावतो हे जाणून घेऊयात.

अभिनय: अभिनय हा शाहरुख खानच्या कमाईचा मुख्य स्त्रोत आहे. अभिनयाची आवड होती म्हणून तर शाहरुखने मुंबई गाठली आणि मोठ्या मेहनतीने आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. टेलिव्हिजनवर एका ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ या मालिकांमधून त्याने अभिनयाला सुरुवात केली. त्यांनतर मोठ्या पडद्यावर त्याने नशीब आजमावले आणि त्यात त्याला यश देखील आले. चित्रपटात अभिनय करून तो बक्कळ कमाई करतो. वर्षाला सरासरी 2 चित्रपट तो करत असतो. मिडिया रिपोर्टनुसार शाहरुख एका चित्रपटात अभिनय करण्यासाठी 50 कोटी रुपये इतकी प्रचंड मानधन आकारतो. देशातला सर्वात महागडा बॉलीवूडस्टार म्हणून शाहरुखला आपण ओळखतोच, पण तो आता जगातील सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक ठरला आहे.मिडिया रिपोर्टनुसार नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ या सिनेमासाठी शाहरुखने 120 कोटी रुपये मानधन आकारले होते.

चित्रपटासोबतच टेलीव्हिजनवर देखील शाहरुख कार्यक्रम करत असतो. .

व्यवसाय: शाहरुख खान आता केवळ अभिनेता नसून उद्योजक देखील बनला आहे. त्याची पत्नी, गौरी खानसोबत भागीदारीत तो SRK रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाने एक प्रॉडक्शन हाऊस चालवतो.अल्पावधीतच या प्रॉडक्शन हाऊसने मोठे नाव कमावले आहे.यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात आघाडीचे नाव असलेल्या Byju's कंपनीत आणि Kidzania सारख्या ब्रँड्समध्ये देखील शाहरुख खानने गुंतवणूक केली आहे. या दोन्ही कंपन्या फायद्यात असून त्यातून शाहरुखने मोठा नफा कमावला आहे.

क्रीडा संघ: आयपीएल संघ म्हणून कोलकाता नाइट रायडर्स हा क्रीडा संघ शाहरुखच्या मालकीचा क्रीडा संघ आहे. मिडिया रिपोर्टनुसार या संघात शाहरूखची 55% भागीदारी आहे. या संघात जुही चावला आणि तिचा पती जय मेहता हे शाहरुखचे भागीदार आहेत. कोलकाता नाइट रायडर्सच्या यशानंतर शाहरुखने वेस्ट इंडियन डोमेस्टिक टी-20 लीगमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार , कोलकाता नाइट रायडर्सरच्या जर्सीच्या मागच्या बाजूवर लोगो देण्यासाठी कंपन्यांना 10 ते 12 कोटी रुपये तर समोरच्या बाजूला लोगो छापण्यासाठी  ते 22 कोटी रुपये द्यावे लागतात.क्रीडा संघाची लोकप्रियता पाहता अनेक कंपन्या प्रायोजकत्व देण्यास तयार असतात.

ब्रांड एंडोर्समेंट: शाहरूखची लोकप्रियता पाहता त्याला आपल्या जाहिरातींमध्ये घेण्यास अनेक कंपन्या उत्सुक असतात. शाहरुख खान गेल्या अनेक वर्षांपासून पेप्सी, व्हर्लपूल, नोकिया, ह्युंदाई, टॅग ह्युअर, डिश टीव्ही, बिग बास्केट आणि बायजूस या ब्रांडचा चेहरा आहे.मिडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान एका जाहिरात शूटसाठी दिवसाला सुमारे 3.5 ते 4 कोटी रुपये इतके मानधन आकारतो.

स्पेशल परफॉर्मन्स : खासगी कार्यक्रमांना देखील शाहरुख हजेरी लावतो. ब्रांड लॉन्चिंग, शाही विवाह सोहळे, पुरस्कार सोहळे यात देखील शाहरुख सहभाग घेतो. या कार्यक्रमांना हजेरी लावायची असल्यास शाहरुख 4 कोटींपेक्षा अधिक मानधन आकारतो, तर काही स्पेशल पर्फोर्मंस  करायचे असल्यास त्यासाठी तो  8 कोटी रुपयांपर्यंत मानधन आकारतो.

शाहरुख खानची नेटवर्थ (Shahrukh Khan NetWorth)

फोर्ब्स रिच लिस्ट 2021 नुसार , शाहरुख खानची वैयक्तिक संपत्ती सुमारे $690 दशलक्ष इतकी आहे, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 5000 कोटींपेक्षा जास्त आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानची एकूण संपत्ती $770 दशलक्ष, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 6295.01 कोटी रुपये इतकी आहे. त्याने सध्या जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत कमाईच्या बाबतीत टॉम क्रूझ, जॉर्ज क्लूनी, रॉबर्ट डी नीरो यांसारख्या भल्याभल्या हॉलीवूड स्टार्सना देखील मागे सोडले आहे.

Source: https://rb.gy/c4fry