Divorce isn't such a tragedy. A tragedy is staying in an unhappy marriage. काही वेळा नियोजन केल्याप्रमाणे, विवाह-बंधन अपेक्षांचा टप्पा गाठू शकत नाही. परिणामी, जोडपी विवाह संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतात. अर्थातच, घटस्फोटाची प्रक्रिया त्यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींवर भावनिक, मानसिक आणि तसेच सामाजिक परिणाम देखील करू शकते. घटस्फोट हे भावनिक आणि त्याचवेळी एक आर्थिक आव्हान देखील असते. मात्र विवाह-विभाजनाच्या संभाव्य परिणामांना सामोरे जाण्याव्यतिरिक्त, जोडप्याला त्यांच्या आर्थिक मालमत्तेचे विभाजन आणि भविष्यातील उत्तरदायित्व निश्चित लागते. आणि या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून, जोडप्याने विवाह अस्तित्वात असताना घेतलेल्या “इन्शुरन्स पॉलिसीज्” संबंधित विचार करणे, अनिवार्य ठरते.
Table of contents [Show]
आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्यास प्राधान्य द्या
घटस्फोटातून जात असलेल्या व्यक्तींनी भविष्यासाठी त्यांच्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. एखाद्या जोडप्याने घटस्फोटासाठी केस फाइल केली की, त्यांनी त्यांच्या सर्व सामायिक मालमत्तेची यादी करणे, आवश्यक आहे. त्यांच्या विभाजनाचा भाग म्हणून, त्यांनी मालमत्तेचे समान आणि निष्पक्षपणे विभाजन करणे, अनिवार्य बनते. जोडप्याने त्यांच्या सहजीवनाच्या कालावधीमध्ये काही टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी केलेले असल्यास, अशा पॉलिसीज् देखील मालमत्तेमध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करावा
संयुक्त विमा पॉलिसी (Joint Life Insurance Policy) घेतली असल्यास, पॉलिसीधारकाने प्रथम पॉलिसीसाठीचा प्रीमियम भरणे बंद करावे. पर्याय अस्तित्वात असल्यास, त्यांनी पॉलिसी सरेंडर करणे, संयुक्तिक ठरेल. जॉईंट इन्शुरन्स पॉलिसींमधून कोणतेही पे-आउट असल्यास, ते समान रीतीने किंवा प्रत्येक भागीदाराने गुंतवलेल्या रकमेच्या आधारावर विभाजित करणे, योग्य ठरेल. “वैयक्तिक टर्म इन्शुरन्स प्लॅन” खरेदी करावा. नव्याने घेतलेल्या पॉलिसीसाठी “नॉमिनी / लाभार्थी” म्हणून रक्ताच्या नातेवाईकाची किंवा त्यांच्या अपत्याची निवड करता येऊ शकते. स्वतःचे वैयक्तिक बजेट तयार करावे आणि सर्व कागदपत्रांमध्ये नॉमिनीच्या सुधारित नोंदी घ्याव्यात.
टर्म प्लॅन पॉलिसीवरील विम्याची रक्कम वाढवा
घटस्फोटाच्या नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे जीवन नव्याने सुरु करणे आणि पुढे नेट राहणे, निश्चितच आव्हानात्मक (challenging) वाटू शकते, परंतु तुम्हाला ते चॅलेंज स्वीकारणे अनिवार्य असते. अशा वेळी स्वतःच्या आर्थिक जबाबदाऱ्यांचे पुनर्मूल्यांकन (Revaluation) करणे, तुमची प्रायॉरीटी असावी. जर तुम्ही एकल पालक (Single Parent) झाला असाल, तर तुम्ही तुमच्या टर्म प्लॅन पॉलिसीवरील विम्याची रक्कम (Sum Assured) वाढविण्याचा विचार केला पाहिजे. तुमच्याकडे बचत आणि गुंतवणूक योजना (Savings & Investment scheme) असल्याची खात्री करून घ्यावी. जेणेकरून, तुम्ही इतर कोणावरही अवलंबून न राहता, तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि आकांक्षा साध्य करू शकाल. जर तुम्हाला मुले असतील, तर तुम्हाला काही खर्चांमध्ये तितकेच योगदान द्यावे लागेल. परंतु असे करताना देखील तुमचे उर्वरित उत्पन्न (Personal finance) स्वतंत्र राहिले पाहिजे.
इन्शुरन्स पॉलिसीचे विभाजन करणे सोपे नाही
घटस्फोट प्रक्रिये-दरम्यान, टर्म इन्शुरन्स पॉलिसीज् बाबत निर्णय घेणे, निश्चितच प्राधान्य नसेलही. मात्र, नॉमिनी / लाभार्थी किंवा कायदेशीर वारसदार यांची नोंद सुधारित करून घेण्यात दिरंगाई करणे किंवा आपले आर्थिक स्रोत / मालमत्ता वेळेमध्ये वेगळे न करणे, याचे भविष्यातील परिणाम गंभीर होऊ शकतात. “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी” सारख्या आर्थिक मालमत्त्तेचे विभाजन करणे, सोपे नाही. परंतु दोन्ही पक्षांनी स्वत:साठी, एकमेकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी वेळेत योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. घटस्फोटासोबत येणार्या अनेक कामांमध्ये लाईफ इन्शुरन्स पॉलिसींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. तथापि, यामुळे भविष्यात एखाद्या भागीदाराच्या मृत्यूच्या वेळी किंवा पॉलिसी मॅच्युरिटीच्या काळामध्ये बरेचदा गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे, घटस्फोटाच्या वेळी दोन्ही भागीदारांनी त्यांच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीत लक्ष घालणे आणि त्याबाबत आवश्यक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान संपूर्ण माहिती आणि योग्य सल्ल्यासाठी कायदेशीर तसेच आर्थिक सल्लागारांसोबतच लाईफ इन्शुरन्स कंपनीचा सल्ला घेणे, भविष्यात व्यक्ती आणि त्यांच्या अवलंबितांच्या (Dependents) आर्थिक हिताच्या सुरक्षिततेसाठी महत्वपूर्ण ठरू शकेल.