Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Lite X : रिझर्व्ह बँकेने लॉन्च केलेले युपीआय लाईट एक्स काय आहे? जाणून घ्या वैशिष्ट्य

UPI Lite X :  रिझर्व्ह बँकेने लॉन्च केलेले युपीआय लाईट एक्स काय आहे? जाणून घ्या वैशिष्ट्य

Image Source : www.twitter.com/NPCI_BHIM

UPI LITE X च्या माध्यमातून आता ग्राहकांना इंटरनेट शिवाय पैशाचे व्यवहार करता येणार आहेत. ग्रामीण किंवा दुर्गम भागात ज्या ठिकाणी नेटवर्कची मोठ्या प्रमाणात समस्या असते, अशा ठिकाणी आता ग्राहकांना पेमेंट करता येणार आहे.

UPI Lite X Feature: डिजिटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या UPI(युनिफाइड पेमेंट इंटरफेस) चा वापर भारतासह जगभरात लोकप्रिय होत आहे. त्यातच आता भारतीय रिझर्व्ह बँकेने युपीआयमध्ये आणखी एक सुधारीत आवृत्ती लॉन्च केली आहे. ती म्हणजे  युपीआय लाईट -एक्स (Upi Lite X) होय. या युपीआय लाईट एक्सचे नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण जाणून घेऊयात..

ऑफलाईन पेमेंट सुविधा-

सध्या वापरात असलेल्या युपीआयच्या वापरातून डिजिटल पेमेंटची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. मात्र, यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑफलाईन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरबीआयने (RBI) युपीआय लाइट एक्स हे फीचर उपलब्ध करून दिले आहे.  UPI LITE X च्या माध्यमातून आता ग्राहकांना इंटरनेट शिवाय पैशाचे व्यवहार करता येणार आहेत. ग्रामीण किंवा दुर्गम भागात ज्या ठिकाणी नेटवर्कची मोठ्या प्रमाणात समस्या असते, अशा ठिकाणी आता ग्राहकांना पेमेंट करता येणार आहे.

युपीआय लाईटची वैशिष्टे-

UPI LITE X हे अॅप नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC)च्या माध्यमातून कार्य करते काम करते. त्यामुळे ग्राहकांना नेटवर्क नसलेल्या ठिकाणी देखील पेमेंट करता येणे सोपे होणार आहे. हे एका मोबाईल वॉलेट  प्रमाणे कार्य करते. या वॉलेटमधून ग्राहकांना पीनचा वापर करून व्यवहार करता येणार आहेत. यासाठी दोन्ही व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडे युपीआय लाईट एक्सची सुविधा असणे गरजेचे आहे.  दरम्यान UPI LITE X च्या माध्यमातून होणारे पेमेंट हे अतिशय जलद होत असल्याचा दावा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्याकडून करण्यात आला आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना एकावेळी जास्तीत जास्त 500 रुपयांचा आणि दिवस भरात 4000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत.