Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is UPI Lite : UPI पेमेंट आता करा ऑफलाईन

UPI Lite

What is UPI Lite : ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी आता भारतात UPI Payments चा उपयोग सर्रास होऊ लागला आहे. अगदी छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही UPI वापरलं जातं. सगळीकडे दरवेळी मोबाईलला नेटवर्क असतंच असं नाही. पण, आता तंत्रज्ञानाने त्यावरही तोडगा काढला आहे UPI Lite चा. पण, या व्यवहारांवर काही मर्यादा आहेत 

तुम्हाला UPI पेमेंट (UPI Payment) करायचं आहे. पण, तिथे नेटवर्क उपलब्ध नाही, काही कारणांनी फोन सुरू नाही, असं होऊ शकतं. अशावेळी म्हणजे फोन ऑफलाईन (UPI Payment while Offline) असतानाही तुम्ही UPI माध्यमातून आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकता. त्यासाठी UPI Lite ही सेवा उपलब्ध आहे. राष्ट्रीय पेमेंट्स समन्वय संस्था अर्थात, NPCI या नियामक संस्थेनं ही सेवा 2016 मध्येच उपलब्ध करून दिली आहे. आणि रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) सप्टेंबर 2022 मध्ये या सेवेचं अधिकृत उद्घाटनही केलं आहे. पण, अजूनही अनेकांना ती फारशी ठाऊक नाही. भिम (BHIM) या केंद्रसरकारच्या  अ‍ॅपवर या सेवेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. UPI लाईटचा उपयोग आणि फायदे समजून घेऊया…    

UPI Lite म्हणजे काय? What is UPI Lite?   

तुम्ही गुगल पे, PayTM, फोन पे अशी अ‍ॅप वापरून पैसे हस्तांतरित करता किंवा एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी पेमेंट करता तेव्हा तुमच्या बँक खात्यातून त्याच क्षणी ती रक्कम वळती होते. आणि दुसऱ्या खात्यात जमा होते. पण, हे शक्य होतं मोबाईल फोनमध्ये इंटरनेट सुरू असेल तर. नाहीतर बँक खात्यात पैसे असूनही तुम्हाला वरील कुठलेही UPI अ‍ॅप वापरता येऊ नाही.     

पण, आता UPI Lite  UPI च्या माध्यमातून नेटवर्क नसताना तुम्ही पेमेंट करू शकता. त्यासाठी भिम अ‍ॅपच्या वॉलेटमध्ये तुम्हाला आधी पैसे साठवावे लागतील. आणि या पैशातून तुम्ही ऑफलाईन पेमेंटही करू शकता. पण, सध्या UPI लाईटमधली व्यवहारांवर आपल्याच सुरक्षिततेसाठी काही बंधनं आहेत.     

  • एका वेळी जास्तीत जास्त 200 रुपयांचे व्यवहार तुम्ही करू शकता.    
  • तुमच्या UPI लाईट वॉलेटमध्ये 2000 रुपयेच साठवू शकता   
  • तुमच्या आताच्या UPI अॅपवर ही सेवा कार्यान्वित करावी लागते   
  • सध्या भारतातल्या सात बँकांनी UPI लाईट सेवा देऊ केली आहे. म्हणजे या सात बँकांमधल्या खात्यातून तुम्ही UPI लाईटसाठी पैसे वळवू शकता. या बँका आहेत - कॅनरा, HDFC, इंडियन बँक, कोटक महिंद्रा, पंजाब नॅशनल, स्टेट बँक ऑफ इंडिया, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक व युनियन बँक    

UPI अ‍ॅप विरुद्ध UPI लाईट UPI Vs UPI Lite   

UPI आणि UPI लाईट यांच्यातील फरक आणि उपयोग खालच्या कोष्टकातून समजून घेऊया…   

UPI   

UPI लाईट   

म्हणजे काय?   

24 तास सुरू असलेली ही सेवा आपल्याला दोन बँक खात्यांमध्ये त्याच क्षणी पैसे हस्तांतरित करण्याची सेवा देते.    

UPI लाईटसाठी एक वॉलेट असेल. आणि छोट्या रकमेचे व्यवहार या वॉलेटमधून तुम्ही करू शकाल. पण, ते रिअल टाईम म्हणजे त्याच क्षणी पूर्ण होतील.   

व्यवहारांची मर्यादा   

एक UPI व्यवहार हा जास्तीत जास्त 2 लाख रुपयांचा असू शकतो. या खेरिज प्रत्येक अॅपने दिवसाला किती आणि किती मूल्याचे व्यवहार करायचे यावर बंधनं घातली आहेत. पण, किमान 1 लाख रुपयाचे व्यवहार करता येतातच.    

ही सेवा ऑफलाईन वापरायची असल्यामुळे जास्तीत जास्त 200 रुपयांचे व्यवहार एकावेळी करता येतात. आणि वॉलेटमध्येही 2000 रुपये साठवता येतात.   

पिन लागतो का?   

4 ते 6 आकडी पिन लागतो   

सध्या UPI लाईटसाठी पिन लागत नाही   

पैसे पाठवू शकतो का?   

हो   

हो   

पैसे मिळू शकतात का?   

हो   

सध्या नाही.    

कोण वापरू शकतं?   

भिम, गुगल पे, पेटीएम यासारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून शंभरच्या वर बँकांच्या खातेधारकांना ही सेवा वापरता येते   

भिम अ‍ॅपवर सध्या ही सुविधा NPCI ने सुरू केली आहे. आणि आठ बँकांचे खातेदार यात व्यवहार करू शकतात.    

केलेल्या व्यवहारांचा लेखाजोखा मिळतो का?    

इथे तुम्ही केलेले व्यवहार लगेच बँक खात्यांमध्ये दिसतात. आणि बँकेकडून लगेच तुम्हाला त्याविषयीचा मेसेज येतो.    

UPI लाईटमधले व्यवहार वॉलेटमधून होत असल्यामुळे बँकेच्या खात्यामध्ये हे व्यवहार दिसत नाहीत. पण, बँकेकडून तुम्हाला दिवसाच्या शेवटी एक मेसेज येतो. वॉलेटमधला बॅलन्सही या मेसेजमध्ये असतो.