थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance) हा भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार सक्तीचा इन्शुरन्स आहे. म्हणजेच वाहन चालकाला हा इन्शुरन्स काढणे कायद्याने बंधनकारक आहे. तुमच्या वाहनाचा अपघात झाल्यास समोरच्या व्यक्तीला झालेली दुखापत, मालमत्तेचे नुकसान आणि त्याच्या गाडीचे नुकसान विम्याद्वारे कव्हर असते. म्हणजेच विमा कंपनी नुकसान भरपाई करेल. अपघातामध्ये जर गाडीतील व्यक्ती दगावली तरीही विम्याचे सरंक्षण मिळते. हा विमा खरेदी करताना विमा कंपनीच्या अटी आणि नियम बाराकाईने वाचून घ्या.
थर्ड पार्टी इन्शुरन्स कसे काम करतो?
अपघातादरम्यान वाहनामुळे इतर व्यक्तीला इजा झाल्यास किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तो व्यक्ती थर्ड पार्टी इन्शुरन्स क्लेम करण्यास पात्र असतो. कारचे नुकसान झाल्यास किंवा इतर कुठल्याही दुर्दैवी परिस्थितीत इन्शुरन्स कंपनीद्वारे नुकसान भरपाई देणे ही कंपनीची जबाबदारी असते.
थर्ड पार्टी इन्शुरन्सचे फायदे (Benefits of third-party insurance)
वाहनासाठी इन्शुरन्स खरेदी करतांना तो थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे गरजेचे आहे. रस्ते अपघातात कुठल्याही नुकसानग्रस्त वाहनाला थर्ड पार्टी इन्शुरन्समार्फत संरक्षण मिळते. वाहनाला झालेले नुकसान व जखमी व्यक्तीच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची भरपाई विमा कंपनी करेल, तुम्हाला खिशातून पैसे घालण्याची गरज नाही. न्यायालयीन कारवाईद्वारे या नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाते.
थर्ड पार्टी इन्शुरन्सची किंमत किती असते? (Third party insurance price)
थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रिमियम (Third Party Insurance Primium) किंमत वाहनाच्या CC वरून ठरविण्यात येते. सामान्य बाइकसाठी 750 रुपये पासून सुरुवात होते. दुचाकी वाहनाचे CC जास्त असल्यास प्रिमियमची किंमत वाढते. तसेच कारसाठी या इन्शुरन्स प्रिमियम सुरुवात 2072 रुपये पासून सुरुवात होते SUV गाड्यांसाठी हा प्रिमियम 3500 रुपयापर्यंत असतो. थर्ड पार्टी इन्शुरन्स हा दोन्हीही अपघातग्रस्त वाहनांसाठी महत्त्वाचा व लाभदायक असतो.