Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rural Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकाला किती पगार असतो? ग्रामीण डाक सेवक बनण्यासाठी काय प्रोसेस आहे?

Post Office Jobs

Post Office Jobs : ग्रामीण डाक सेवक भरती देखील खूप लोकप्रिय आहे, कारण 10 वी पास उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात आणि हजारो पदे यावर येत राहतात. भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक कसे बनू शकता? त्यांना किती पगार असतो जाणून घेऊया.

Rural Post Office : सरकारी नोकऱ्यांसाठी पोस्ट विभागात अनेक पर्याय आहेत. येथे ग्रामीण डाक सेवक, पोस्टमास्टर अशा अनेक पदांवर भरती केली जाते. ग्रामीण डाक सेवक भरती देखील खूप लोकप्रिय आहे, कारण 10 वी पास उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात आणि हजारो पदे यावर येत राहतात. भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक कसे बनू शकता? त्यांना किती पगार असतो जाणून घेऊया.

ग्रामीण डाक सेवक भरती अंतर्गत, शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर आणि डाक सेवक या पदांचा समावेश आहे. पोस्ट विभाग वेळोवेळी या पदांसाठी भरती करत असतो. नुकतीच 12,000 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया संपली आहे. यापूर्वी सुमारे 40 हजार पदांसाठी भरती करण्यात आली होती.

ग्रामीण डाक सेवक कोण बनू शकतो? 

ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यासोबत स्थानिक भाषेचेही ज्ञान असायला हवे. याशिवाय जीडीएस पदांसाठी सायकलिंग ओळखले पाहिजे. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी विहित केलेल्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे तर, ती किमान 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे आहे.

नोकरी कशी मिळवायची?

ग्रामीण डाक सेवक पदांसाठी निवड प्रणालीद्वारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाते. ही गुणवत्ता यादी उमेदवारांनी 10वी मध्ये मिळवलेले गुण आणि त्यांनी भरलेल्या पदांच्या प्राधान्याच्या आधारे तयार केली जाते. यासाठी अर्ज करतांना निघालेल्या जागांवर लक्ष ठेवून CSC सेंटरमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. 

पगार किती मिळतो? 

शाखा पोस्टमास्टर पदांवर निवड झाल्यानंतर, उमेदवाराला 12,000 रुपये ते 29,380 रुपये मासिक वेतन दिले जाते. त्याचबरोबर सहाय्यक शाखा पोस्टमास्टर पदांसाठी, ते 10,000 ते 24,470 पर्यंत आहे. या पदासाठी अनेक उमेदवार अर्ज करतात. 

Source : hindi.financialexpress.com