Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mental Health Coverage: हेल्थ इन्शुरन्समध्ये मेंटल हेल्थ कव्हरेज का महत्त्वाचा आहे? यात कोणते आजार कव्हर होतात?

Mental Health Coverage

Mental Health Coverage: डेलॉइटच्या आताच्या अहवालानुसार, भारतात मानसिक आरोग्याच्या समस्यांनी अनेक लोक ग्रस्त आहे. जगभरातील मानसिक आरोग्याच्या एकूण प्रकरणांपैकी 15 टक्के प्रकरणं भारतात आहे.

Mental Health Coverage: मेंटल हेल्थ हा एक असा विषय आहे; ज्यावर आजही समाजात उघडपणे बोलले जात नाही. जे लोक मेंटल हेल्थच्या समस्यांना तोंड देत आहेत. त्यांच्या मनात भीती असते की लोकांना त्यांचा प्रॉब्लेम समजणार नाही. मात्र, कोरोना महामारीसोबतच लोकांमध्ये मेंटल हेल्थबाबत जागरूकता वाढली आहे. मेंटल हेल्थ ग्रस्त रुग्ण वाढण्याचे मुख्य कारण लेट उपचार आणि या विषयावरील न होणारी चर्चा हे आहे. ज्याप्रमाणे मेंटल हेल्थ समस्येवर उपचार आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे सर्वसमावेशक आरोग्य विमा योजनेद्वारे मेंटल हेल्थ कव्हरेज सुनिश्चित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. (Mental health coverage is very important.)

कोरोना महामारीनंतर आरोग्य विम्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढली आहे. परंतु मेंटल हेल्थ  कव्हरेजबाबत अजूनही जागरूकतेचा अभाव आहे. नुकताच जागतिक मानसिक आरोग्य दिन (Mental Health Day) होऊन गेला. त्यानिमित्त आम्ही तुम्हाला आरोग्य विम्याअंतर्गत मानसिक आरोग्य कव्हरेजबद्दल सांगणार आहोत.

मेंटल हेल्थ कव्हरेज अंतर्गत काय सुविधा दिल्या जातील? 

आज अनेक आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध आहे. त्या पॉलिसीधारकाला संभाव्य मानसिक विकारामुळे हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी कव्हर करतात. अशा पॉलिसींमध्ये रुग्णाच्या रूमचे भाडे, औषधे, रुग्णवाहिका फी आणि ट्रीटमेंटचा खर्च समाविष्ट असतो. ही रक्कम मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या ओपीडीवर (बाहेरील रुग्ण विभाग) खर्च होण्याची शक्यता आहे. विमा कंपन्या अशा योजना घेऊन येत आहेत ज्या असे ओपीडी खर्च कव्हर करतात. प्रत्येकाने ओपीडी खर्च कव्हर करणारी पॉलिसी निवडली पाहिजे. काही आजार जे मानसिक आरोग्याअंतर्गत येतात आणि जे विम्याअंतर्गत येतात ते पुढीलप्रमाणे आहेत:

  • चिंता विकार anxiety disorder
  • तीव्र डिप्रेशन Severe depression
  • पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर Post Traumatic Stress Disorder
  • अटेंशन डेफिसिट/हाइपर अॅक्टिविटी कंडीशन (Attention deficit/hyperactivity condition)
  • बी-पोलर डिसऑर्डर (Bi-polar disorder)
  • मूड अन-रेस्ट (Mood un-rest)
  • एक प्रकारचा मानसिक विकार (A type of mental disorder (Schizophrenia)
  • ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर (Obsessive Compulsive Disorder)
  • मानसिक अस्वस्थता (Mental restlessness)

मेंटल हेल्थ कव्हरेज पॉलिसी कोणी खरेदी करावी?

मेंटल हेल्थच्या  समस्या विशिष्ट वय किंवा लोकांच्या गटापुरत्या मर्यादित नाहीत. या समस्या तरुणांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सारख्याच असतात. काही आजार आनुवंशिक असतात, ते पिढ्यानपिढ्या चालतात, त्या लोकांनी हा विमा खरेदी करण्याचा विचार केला पाहिजे कारण अशा परिस्थितीत या आजाराचा धोका जास्त वाढतो. (Health Insurance Policy)

प्रीमियम किती असेल? (Premium for Mental health Coverage Policy)

विमा योजनांचा एक भाग म्हणून मेंटल हेल्थचा समावेश करणे नुकतेच सुरू झाले आहे. सध्या, या कव्हरेजसाठी कोणतेही अतिरिक्त प्रीमियम नाही. हे नैसर्गिकरित्या तुमच्या आरोग्य योजनेत समाविष्ट आहे.