Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FAQ OF G20: G20 Summit म्हणजे काय? यात कोणकोणते देश सहभागी असतात?

FAQ OF G-20

G20 Summit in India: G-20 हा जगातील 20 प्रमुख देशांचा गट आहे. G20 गटात 19 देश आणि युरोपियन संघाचा सहभाग आहे. यावर्षी G-20 संघाचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे.

G-20 हा जगातील 20 प्रमुख देशांचा गट आहे. या गटामध्ये प्रत्येक देशाचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट असतो. साधारणत: G20 गटात 19 देश आणि युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हे युरोपियन संघाचे G-20 मध्ये प्रतिनिधित्व करतात.

G-20 गटामध्ये कोणते देश सहभागी आहेत?

G-20 गटामध्ये अफ्रिका खंडातील दक्षिण अफ्रिका, उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा, मेस्किको, अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेटिना, ब्राझील, आशिया खंडातील चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, इंडोनिशिया, मध्यपूर्वमधील सौदी अरेबिया, रशिया, तुर्कस्तान, ऑस्ट्रेलिया तर युरोपमधील युरोपियन संघ, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युनायटेड किंगडम या देशांचा सहभाग असतो.

G-20 समिटचे आयोजन कसे ठरते?

कोणता देश G-20 Summit चे आयोजन करणार किंवा कसे करणार हे ठरवण्यासाठी G-20 मधील देशांचे पाच वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 4 देशांचा समावेश करण्यात आला असून, या गटानुसार कोणता देश बैठकीचे आयोजन करणार याचे नियोजन ठरवले जाते. 2008 पासून ही पद्धत वापरली जाते. गेल्यावर्षी G-20 समिटचे आयोजन इंडोनेशिया देशाकडे होते. तर यावर्षी भारताकडे याचे यजमान पद आहे.

G-20ची पहिली बैठक मुंबईत होणार!

G-20 चे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. त्यामुळे या G-20 समिट अंतर्गत भारत जगातील सर्व महत्त्वाच्या विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व करणार आहे. या समिटमधील पहिल्या वर्किंग ग्रुपची बैठक 13 ते 16 डिसेंबर या दरम्यान मुंबईत होणार आहे.

G-20चे कामकाज कसे चालते?

G-20 समिटला स्वत:चे मुख्यालय नाही. या कमिटीचा कारभार आणि अजेंडा हा G-20 मधील देशांच्या प्रतिनिधींद्वारे राबविला जातो. त्यांना शेर्पा म्हणून ओळखले जाते. भारताकडून नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत हे G-20चे शेर्पा असतील. पुढील संपूर्ण वर्ष म्हणजे 2023 मध्ये G-20 चे अध्यक्षपद भारताकडे असणार आहे.

G-20ची स्थापना कधी झाली?

जागतिक पातळीवरील विविध देशांशी अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांना चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी विविध देशांनी एकत्र येऊन 26 सप्टेंबर, 1999 मध्ये G-20 गटाची स्थापना करण्यात आली.