Employees State Insurance Act: कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 (Employee State Insurance Act, 1948) हा भारतातील कामगारांसाठी अस्तित्वात आलेला पहिला सामाजिक सुरक्षेवरील मोठा कायदा आहे. या कायद्यांतर्गत कामगारांना आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा (इन्शुरन्स) प्रदान करण्यात आली आहे. जसे कामगारांना एखादा आजार झाला किंवा एखाद्या दुर्घटनेत त्यांना तात्पुरते किंवा कायमचे अंपगत्व आले असेल किंवा महिला कामगारांना मातृत्वाच्या काळात आर्थिक सुरक्षितता मिळते. तसेच या कायद्यांतर्गत कामावर असताना झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई देण्याची सुविधा या कायद्यात आहे.
Table of contents [Show]
कामगार राज्य विमा अधिनियम, 1948 द्वारे फेब्रुवारी, 1952 मध्ये कामगार राज्य विमा योजना सुरू करण्यात आली. ही भारतातील पहिली सामाजिक विमा (इन्शुरन्स) योजना मानली जाते. या विमा योजनेद्वारे कामगारांना आर्थिक संरक्षणाचा लाभ मिळतो. केंद्राच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे या कायद्यांतर्गत कामगार राज्य विमा योजना राबवली जाते.
कर्मचारी राज्य विमा अधिनियम, 1948 | Employee State Insurance Act, 1948
1948चा हा कायदा आजारपण, प्रसुती आणि कामावर/सेवेवर असताना कामगाराला इजा झाल्यास त्याबदल्यात त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना लाभ उपलब्ध करून देण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आणण्यात आला आहे. या कायद्याची सुरूवात 24 फेब्रुवारी, 1952 ला कानपूर येथे झाली होती. हा कायदा भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व नागरिकांना लागू होतो. या कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हावी यासाठी कर्मचारी राज्य विमा निगमची स्थापना करण्यात आली.
राज्य विमा महामंडळातर्फे कामगारांना थेट मदत!
कर्मचारी राज्य विमा कायद्यांतर्गत कामगार राजय् विमा महामंडळाच्यावतीने कामगारांना आजारपण, काम करत असताना अंशत: किंवा कायमचे अंपगत्व आल्यास किंवा एखाद्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याला रोख रकमेत मदत देण्याची सुविधा आहे. तसेच या योजनेंतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा खर्च, अॅम्ब्युलन्सचा खर्च देण्याची सोय आहे.
या कायद्यांतर्गत कोणाला लाभ मिळू शकतो?
ज्या ठिकाणी 10 किंवा त्याहून अधिक कामगार काम करत आहेत, अशा कारखान्यांना किंवा कंपन्यांना ही योजना लागू होते. तसेच प्रत्येक महिन्याला 21 रुपये पगार असलेले कर्मचारी या योजनेतील आरोग्य विमा संरक्षण आणि ईएसआय (Employee State Insurance-ESI) कायद्यांतील तरतुदींचा लाभ घेऊ शकतात.