Preventive nasal vaccine for coronavirus: चीनमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाव्हायरसचा उद्रेक होत आहे. भारत दक्ष आहे, सरकारने काही अंशी निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच करोनाला रोखण्यासाठीच्या योजना आखत आहेत. नुकतेच शासनाने नाकावाटे घेण्याच्या लसीला मान्यता दिली आहे. ही करोना निर्बंधासाठी बनवलेली जगातली पहिली नाकावाटे घेण्याची लस (NasalVaccine) आहे. सध्या ही लस (iNCOVACC) कोव्हिन अॅपवर उपलब्ध झाली असून त्यावर नोंदणी करून लस घेता येऊ शकते. या लसीला केवळ बुस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे बुस्टर डोसच्या नोंदणी करतानाच ही लस निवडता येईल. या लसीची किंमत हजार रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
जीएसटीसहीत लसीची किंमत किती? Vaccine cost including GST
हैद्राबादच्या भारत बायोटेक कंपनीने नाकावाटे घेण्याची, करोनाव्हारसला प्रतिबंधात्मक लसची निर्मिती केली आहे. या लसीला (iNCOVACC) भारत सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. शासनाने या लसीची किंमत ठरवली आहे. या लसीची मूळ किंमत 800 रुपये आहे. या लसीवर सरकारने 5 टक्के जीएसटी कर लावला आहे. त्यामुळे याची किंमत 840 रुपये होते. सध्या ही लस केवळ खाजगी रुग्णालय आणि लस केंद्रावर उपलब्ध आहे. यामुळे यात डॉक्टर फी, इतर रुग्णालय किंवा केंद्रांचे चार्जेस लागून लस घेण्यासाठी 900 ते हजार रुपये मोजावे लागू शकतात.
सध्या iNCOVACC ही लस सरकारी केंद्रावर उपलब्ध होणार नाही आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुख मंगला गोमारे यांनी सांगितले. तरी सरकारी रुग्णालये आणि केंद्रावर लस उपलब्ध झाल्यावर ही लस 325 रुपयांना मिळणार आहे. या 325 रुपयांवरही 5 टक्के जीएसटी कर लागू होणार आहे. यामुळे याची किंमत 16.25 रुपयांनी वाढले अर्थात 342 रुपयांना ही लस उपलब्ध होईल. ही लस केवळ कोव्हीन अॅपवर नोंदणी करणाऱ्या व्यक्तींनाच मिळणार आहे. या लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता मिळाल्याने, ज्या व्यक्तींनी दोन्ही लसीचे डोस घेतले असतील त्यांनाच ही लस घेता येणार आहे. असेही गोमारे यांनी सांगितले.
नाकावाटे देण्यात येणारी करोना प्रतिबंधात्मक लस (iNCOVACC) ही जानेवारी महिन्याच्या अखेरीस केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. सध्या कोव्हीन अॅपद्वारे केवळ नोंदणी सुरू झाली आहे. लसीचा पुरवठा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती भारत बायोटेक कंपनीने माध्यमांना दिली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, भारत बायोटेकला भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून (CDSCO) इन्कोव्हॅक (iNCOVACC) लस बूस्टर डोस म्हणून वापरण्याची परवानगी मिळाली आहे. ही लस वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, सेंट लुईस यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            