Benefit Of LIC Jeevan Pragati Bima Yojana: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या उत्कृष्ट विमा पॉलिसी योजना घेऊन येत असते. एलआयसीने विविध वयोगटातील ग्राहकांच्या गरजा ओळखून विविध प्लॅन आणले आहे. LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेमध्ये ग्राहकांना कोणकोणते लाभ मिळते ते जाणून घ्या.
Table of contents [Show]
महिन्याला किती रुपयांचे प्रीमियम
LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेमध्ये तुम्हाला सिक्युरिटीसह गुंतवणुकीचा पर्याय मिळतो, ज्यामुळे तुम्हाला मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर मोठी रक्कम मिळते. ही योजना तुम्हाला काही वर्षांत चांगला लाभ मिळवून देते. यामध्ये, दररोज 200 रुपये म्हणजेच दरमहा 6000 रुपये जमा करून, तुम्हाला मॅच्युरिटीवर 28 रुपये लाखांपर्यंत मोठी रक्कम मिळू शकते. LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेअंतर्गत, तुम्हाला किमान 12 आणि 20 वर्षांची मुदत मिळते.
काय आहे योजना?
दररोज 200 रुपये आणि एका महिन्यात 6 हजार रुपये जमा केल्यास, वर्षाला ७२ हजार रुपये जमा होतात. त्यानंतर या योजनेत 20 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला बोनससह 28 लाख रुपये मिळतील. या विमा योजनेतील जोखीम संरक्षण दर 5 वर्षांनी वाढते. विम्याची रक्कम दर 5 वर्षांनी वाढते. त्याच पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, बोनस आणि विमा रक्कम जोडून त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला दिली जाते. या पॉलिसीमध्ये ग्राहकाला आजीवन संरक्षण दिले जाते.
एकूण रक्कम किती मिळणार?
जीवन प्रगती विमा योजनेमध्ये ग्राहकाने 4 लाख रुपयांची विमा पॉलिसी घेतली असेल तर 5 वर्षानंतर ती 5 लाख रुपये होईल. त्यानंतर 10 ते 15 वर्षांसाठी 6 लाख रुपये आणि 20 वर्षांत ही रक्कम 7 लाख रुपये होईल. म्हणजे 20 वर्षांनंतर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम 28 लाख रुपये होईल.
इतर माहिती
- LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेअंतर्गत, ग्राहकाला किमान 12 आणि 20 वर्षांची मुदत दिल्या जाते.
- विशेषत: १२ ते ४५ वयोगटातील लोक ही विमा योजना घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत, प्रीमियमची रक्कम तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर जमा केली जाऊ शकते.
- या पॉलिसीची किमान विमा रक्कम 1.5 लाख आहे आणि कमाल मर्यादा नाही.