शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. यामध्ये गुंतवणूकीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात Swing Trading ही देखील प्रचलित असणारी एक पद्धत आहे. Swing Trading म्हणजे काय, ते जाणून घेऊया.
रोजच्या रोज शेअर मार्केटमध्ये हजारो कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार पार पडत असतात. हे व्यवहार सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 या वेळेमध्ये होत असतात. शेअर्सच्या भावात चढ उतार होत असतात. यातून अनेकांना उत्पन्नाच्या संधी दिसतात आणि ते शेअर्सची खरेदी करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेत शेअर बाजारात Swing Trading देखील केली जाते.
swing trading चा कालावधी कमी असतो
स्विंग ट्रेडिंगला काही वेळा पोझिशनल ट्रेडिंग, मोमेंटम ट्रेडिंग या नावांनी देखील ओळखण्यात येते. स्विंग ट्रेडिंगमध्ये शेअरच्या भावांमध्ये होणाऱ्या चढ-उतारांचा फायदा घेऊन काम केले जाते. एखाद्या शेअर्सचा चार्ट बघताना लक्षात येते की त्या शेंसर्सचा भाव कायम कमी-जास्त होत असतो. हे अस शेअरच्या किमतीत वर खाली होत राहणे याला स्विंग म्हणजेच झोका असे म्हटले जाते. शेअरच्या भावात होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला जातो. शेअरचा भाव केव्हा कमी होतो, केव्हा जास्त होतो याचा करून व्यवहार केले जातात आणि यातून नफा मिळवला जातो. आठवड्याभरापर्यंत किवा 15 दिवसंपर्यंत हे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात त्याला स्विंग ट्रेडिंग असे म्हटले जाते. शेअर्स खरेदी करून 2 ते 3 महिन्यापर्यंत होल्ड करतात. या कालावधीसाठीही काही वेळा स्विंग ट्रेडिंग असे म्हटले जाताना दिसते.
swing trading साठी हे समजून घेणे आवश्यक
शेअर मार्केटमधल्या ट्रेडिंगसाठी अनेक जण Swing trading ही पद्धत वापरताना दिसतात. एक यशस्वी स्विंग ट्रेडर होण्यासाठी काही गोष्टी शिकून घेणे महत्वाचे मानले जाते. येत्या काळामध्ये कोणत्या शेअर्सचा भाव वर जाऊ शकेल ते ओळखणे, हे यात शिकणे गरजेचे असते. त्याचबरोबर आपल्या पैशाची गुंतवणूक करताना पोझिशन साईझिंग आणि स्टॉप लॉस या दोन नियमांचे पालन करणे महत्वाचे मानले जाते.
स्विंग ट्रेडिंगमध्ये कोणत्या शेअरमध्ये किती पैसे गुंतवले जातात आणि स्टॉप लॉस कसा मॅनेज केला जातो हे स्विंग ट्रेडिंगमध्ये महत्वाचे असते.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)