Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सिल्वर ईटीएफ (Silver ETF) काय आहे?

सिल्वर ईटीएफ (Silver ETF) काय आहे?

सिल्वर ईटीएफ (Silver ETF) मध्ये चांदी या धातूमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ईटीएफ चा समावेश होतो. हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील चांदीमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे यातील गुंतवणुकीची माहिती महत्वाची आहे.

सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर भौतिक रुपातून सोने खरेदी करण्याबरोबरच सॉव्हेरिन बाँड स्किम, गोल्ड ईटीएफ(ETF), गोल्ड म्युच्युअल फंडचा पर्याय आहे. परंतु चांदीत गुंतवणुकीसाठी पारंपरिकच पर्याय आहे. साधारणतः दागिने आणि नाण्याच्या रुपातून चांदीची खरेदीदारी होते. परंतु आता भांडवल बाजार नियामक संस्था सेबीने सिल्वर ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) लाँच करण्यास परवानगी दिली आहे.

चांदीचा वापर हा औद्योगिक रुपातून होत असल्याने त्यास नेहमीच मागणी राहते आणि परिणामी किंमतीतही वाढ होते. त्यामुळे सिल्वर ईटीएफ योजना गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकते आणि हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अनिश्चिततेच्या काळात चांदीची मागणी आणखी वाढते. कारण अशा काळात चांदी ही एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिला जातो.  

2008 ते  2009 या काळात जागतिक मंदीच्या काळात  1 जानेवारी  2008 ते  27 फेब्रुवारी  2009 या काळात निफ्टी- 50 टोटल रिटर्न इंडेक्सने  54.43 टक्क्याने तोटा नोंदवला होता , त्याचवेळी चांदीने  13.08 टक्के वाढ नोंदवली होती. 

सांगण्याचे तात्पर्य एवढेच की , अन्य गोष्टीबरोबरच चांदीत गुंतवणूक केल्याने पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनचा फायदा मिळतो. जेव्हा जेव्हा महागाई वाढली आहे , तेव्हा चांदीचे भाव वाढले आहेत. अशावेळी चांदीत गुंतवणूक हा एक आकर्षक पर्याय म्हणून राहिला आहे.  चांदीने तीन वर्षात सुमारे  74 टक्के परतावा दिला आहे.

सिल्वर ईटीएफ म्हणजे काय? What is Silver ETF?

एक्स्चेंज ट्रेडेड फंड हे एक प्रकारचे म्युच्युअल फंडच असतात. परंतु त्यास एखाद्या शेअरप्रमाणे खरेदी किंवा विक्री करता येऊ शकते. यात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खात्याची गरज असते. सिल्वर ईटीएफ हे गुंतवणुकदारांच्या पैशांना चांदीत गुंतवणूक करण्याची संधी देते. सिल्वर ईटीएफच्या माध्यमातून चांदीत गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय आहे. 

या ईटीएफचा उद्देश हा यात गुंतवणूक करणाऱ्या  ग्राहकांना घरगुती बाजाराप्रमाणे शुद्ध चांदीतून मिळणाऱ्या  नफ्यासारखाच लाभ  देणे होय. भौतिक चांदीत गुंतवणूक करण्याऐवजी सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे गरज पडल्यास सहजपणे त्याची विक्री करता येणे शक्य आहे. कारण हे स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड असतात आणि त्याच्या देखभालीचा खर्च देखील कमी असतो.  सिल्वर ईटीएफमधील गुंतवणूक ही भौतिक रुपातील गुंतवणुकीच्या तुलनेत अधिक सुरक्षित मानली जाते. 

सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यावर कोणतिही करसवलत मिळत नाही. परंतु तीन वर्षापेक्षा अधिक काळात गुंतवणूक सुरू ठेवल्यास आणि त्यानंतर त्याची विक्री केल्यास त्यावर आकारल्या जाणार्  या  लाँग  टर्म  कॅपिटल गेनवर इंडेसेक्शनचा  लाभ मिळू  शकतो.  यामुळे  लाभावर  आकारला  जाणारा  कर  हा  कमी  राहू शकतो.

सिल्वर ईटीएफमध्ये आपण शंभर रुपयाने गुंतवणूक सुरू करू शकता. एखाद्या कंपनीचा एनएफओ सुरू असेपर्यंत प्रारंभिक किंमतीत त्याची खरेदी करता येऊ शकते. एनएफओ बंद झाल्यानंतर तो स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड होतो. अशा स्थितीत   गुंतवणूकदार ब्रोकरच्या माध्यमातून सिल्वर ईटीएफची खरेदी बाजारातून करू शकतात.