भारतीय नौदलात अत्याधुनिक युद्ध नौकांचा समावेश करण्यात येत आहे. शुक्रवारी उपराष्ट्रपती जगदीप धनकड (Jagdeep Dhankad) यांच्या हस्ते आएनएस महेंद्रगिरी या युद्धनौकेचे जलावतरण (Launch of Mahendragiri,) करण्यात आले. अत्याधुनिक शस्त्रअस्त्रांनी सज्ज असलेल्या या जहाजाची बांधणी मुंबईच्या माझगाव डाक शिपिंग बिल्डर्स या कंपनीने केली आहे. आएनएस महेंद्रगिरी हे प्रोजेक्ट 17-A यामधील 7 वे आणि शेवटचे जहाज आहे. प्रोजेक्ट 17-A (Project -17 A) नेमकं काय आहे, आणि त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
काय आहे प्रोजेक्ट 17-A?
भारतीय नौदलाची क्षमता आणखी वाढवण्यासाठी 2019 मध्ये प्रोजेक्ट 17 अल्फा फ्रिगेट्स (P-17A) हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. प्रोजेक्ट 17 अल्फा या अंतर्गत भारतीय नौदलासाठी 7 नवीन युद्ध नौका तयार करण्यात आल्या आहेत. प्रोजेक्ट 17A फ्रिगेट्स हा शिवालिक श्रेणीतील युद्ध नौका तयार करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रोजेक्ट 17 ची सुधारित आवृत्ती आहे. या प्रोजेक्ट 17A मध्ये सुधारित तयार करण्यात येणारी लढावू जहाजे ही स्टेल्थ तंत्रज्ञानासह प्रगत शस्त्रे, मिसाईल, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीसह सुसज्ज आहेत.
45000 कोटींचा प्रोजेक्ट
भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17-A या युद्धनौका निर्मिती प्रोजेक्टसाठी तब्बल 45 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये निलगिरी श्रेणीतील या युद्धनौका बांधणीसाठी प्रत्येकी 4000 कोटी खर्च आला आहे. या युद्धनौकांची बांधणी भारतातच करण्यात आली असून गार्डन रीच शिपबिल्डर्स आणि इंजिनिअर्स (GRSE) या कंपनीने 3 युद्ध नौकांची बांधणी केली आहे. तर Mazagon डॉक लिमिटेड (MDL) ने 4 युद्धनौकांची बांधणी केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी 2019 ते 2023 या कालावधी दरम्यान सातही युद्धनौकांचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. तसेच या जहाज निर्मितीसाठी आवश्यक असलेली उपकरणे आणि प्रणालींसाठी लागणारी 75% सामग्री ही स्वदेशी कंपन्यांकडून खरेदी करण्यात आली आहे.
महेंद्रगिरीचे जलावतरण
महेंद्रगिरी ही सातवी युद्धनौका माझगाव डाकमध्ये तयार करण्यात आली आहे. शुक्रवारी उप राष्ट्रपती धनकड यांच्या हस्ते हिचे जलावतरण करण्यात आले. या युद्धनौकेचे वजन 3450 टन इतके आहे. या युद्धनौकेच्या निर्मितीसाठी अंदाजे 210 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची (एमएसएमई) या प्रकल्पामध्ये गुंतवणूक असून, अंदाजे 1000 उपकंत्राटी कर्मचारी या प्रकल्पासाठी कार्यरत होते. या प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेल्या युद्धनौका या निलगिरी श्रेणीतील असून, सातही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. महेंद्रगिरी 2026 पर्यंत प्रत्येक्ष नौदलाच्या सेवेत दाखल होण्याचा अंदाज आहे.