Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NiftyBeES काय आहे? त्याची खरेदी कशी केली जाते?

What is NiftyBeES

NiftyBeES: NiftyBeES हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे; जो Nippon India AMC या कंपनीद्वारे चालवला जातो. या फंडाचे उद्दिष्टे निफ्टी 50 (Nifty 50) या इंडेक्सप्रमाणे गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगले रिटर्न्स मिळवून देणे, हा आहे.

शेअर मार्केटमध्ये आज प्रत्येकाला गुंतवणूक करायची आहे. पण महागडे शेअर्स आणि भरपूर रिस्क यामुळे बरेच जण शेअर मार्केटच्या रस्त्यालाच जात नाहीत. पण शेअर मार्केटबद्दल लोकांची हिच भीती दूर करण्याचे काम एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange Traded Fund-ETF) करत असतात. ETF हा एक असा फंड आहे; ज्यामध्ये विविध प्रकारच्या शेअर्सचा समावेश असतो. नवीन गुंतवणुकदारासाठी स्टॉक मार्केटमध्‍ये हा एक चांगला प्रवेश बिंदू ठरू शकतो आणि अनुभवी गुंतवणूकदारांसाठी एक चांगली गुंतवणूक होऊ शकते. अशाच एक उत्तम ETF फंड म्हणजे NiftyBeES बद्दल जाणून घेऊ.

NiftyBeES म्हणजे काय? What is NiftyBeES?

NiftyBeES हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे; जो Nippon India AMC या कंपनीद्वारे चालवला जातो. या फंडाचे उद्दिष्टे निफ्टी 50 (Nifty 50) या इंडेक्सप्रमाणे गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगले रिटर्न्स मिळवून देणे, हा आहे. NiftyBeES हा भारतातील सर्वात पहिला एक्सचेंज ट्रेडेड फंड असून त्याची सुरुवात जानेवारी 2002 मध्ये मध्ये झाली होती. ETF मध्ये NiftyBeES म्युच्युअल फंड आणि शेअर्स या दोन्हींचे फायदे एकत्रित असतात. NSE (National Stock Exchange) आणि BSE (Bombay Stock Exchange) सारख्या स्टॉक एक्सचेंजमध्ये NiftyBeES चे व्यवहार केले जाऊ शकतात. NiftyBeES च्या एका युनिटमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला संपूर्ण निफ्टी 50 इंडेक्समध्ये एक्सपोजर मिळते, ज्यामध्ये भारतीय शेअर मार्केटमधील 13 विविध क्षेत्रांमधील 50 विविध शेअर्सचा समावेश आहे. त्यामुळे, NiftyBeES मधील गुंतवणुकीतून मिळणारे रिटर्न्स हे निफ्टी 50 इंडेक्सच्या रिटर्न्स एवढेच असतात.

NiftyBeES चे फायदे काय?

बेनिफिट ऑफ डायव्हर्सिफिकेशन (Benefit of Diversification)

NiftyBeES ETF मध्ये गुंतवणूक केल्याने तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणण्यास मदत होते. या फंडमुळे 13 वेगवेगळ्या क्षेत्रातील 50 वेगवेगळ्या स्टॉक्सचे एक्सपोजर मिळते व रिस्क देखील विभागली जाते.

गुंतवणूक करण्यास एकदम सोपे (Easy To Invest)

NiftyBeES च्या युनिट्सची ट्रेडिंग इतर स्टॉक्स प्रमाणेच केली जाते. NiftyBeES च्या युनिट्सची खरेदी आणि विक्री करण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खाते आवश्यक आहे. तसेच, तुम्ही त्यात शेअर्सप्रमाणे ट्रान्सॅक्शन करणे निवडू शकता.

हाय लिक्विडीटी (High Liquidity)

निफ्टी बीईएस (Nifty BeES) हा बाजारातील सर्वात जुना ईटीएफ आहे, ज्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. निफ्टी बीईएस स्टॉक एक्स्चेंजमध्ये हाय लिक्विडीटी असणारा ईटीएफ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गुंतवणूकदाराच्या सोयीनुसार ट्रेडिंग करणे शक्य होते.

पारदर्शक गुंतवणूक (Transparent and Easy to Follow)

यामध्ये निफ्टी 50 प्रमाणेच नक्कल होत असल्याने, गुंतवणूकदाराचे पैसे नक्की कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या कंपनीत गुंतवले जात आहेत, याची माहिती असते. त्याचप्रमाणे NiftyBeES मध्येही पारदर्शकता राहते. निफ्टी 50 मधील गुंतवणुकीवरून NiftyBeESमधील गुंतवणुकीचा अंदाज लावता येऊ शकतो.

स्वस्त गुंतवणूक (Inexpensive Investment)

गुंतवणूकदार ETFचे एक-एक युनिट खरेदी करू शकतो आणि 50 वेगवेगळ्या कंपन्यांच्या वैविध्यतेच्या फायद्यांचा आनंद घेऊ शकतो. तसेच, हे एक पॅसिव्ह गुंतवणूक धोरण असल्याने, त्याचे एकूण खर्चाचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. याची आताची मार्केटमधील किंमत 200 रुपये प्रति युनिट आहे.