ICICI Bank Saving Account Charges: प्रत्येक बँकेच्या बचत खात्यात दरमहा कमीतकमी रक्कम नियमानुसार ठेवावी लागते. अन्यथा बँक दंड आकारते. यास काही खास सुविधा असलेले बँक खाते अपवाद आहेत. सॅलरी अकाउंटसुद्धा सहसा झिरो बॅलन्स असते. या लेखात पाहूया आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यात किती रक्कम ठेवावी लागते. बँकेच्या ATM सह इतर व्यवहारांवर किती शुल्क आकारले जाते.
महिन्यात सरासरी किती रक्कम असावी?
बँकेकडून रेग्युलर बचत खात्यांसाठी मंथली अॅव्हरेज बॅलन्स (MAB) काढला जातो. जर MAB चे नियम पाळला नाही तर बँक दंड आकारते. (ICICI Bank MAB rules) म्हणजेच खात्यात रक्कम कमी असेल तर शुल्क आकारले जाते.
मिनीमन बॅलन्स नियम (दरमहा)
मेट्रो आणि मोठी शहरे - 10 हजार रुपये.
निम-शहरी भाग - 5 हजार रुपये.
ग्रामीण भाग - 2 हजार रुपये. / 1 हजार रुपये ( शाखेचे ठिकाण आणि बँकेच्या नियमानुसार)
कमीत कमी रक्कम (MAB) खात्यात न ठेवल्यास दंड किती?
महिन्यात सरासरी रक्कम ठेवण्यासाठी जेवढे पैसे कमी असतील त्याच्या 6% किंवा 500 रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढा दंड आकारला जाईल.
इतर सेवा शुल्क किती?
ICICI सह इतरही अनेक बँकांनी शाखेत जाऊन होणाऱ्या रोख व्यवहारांवर मर्यादा घातल्या आहेत. या मर्यादेपेक्षा जास्त रोख जमा किंवा पैशाचे व्यवहार केले तर शुल्क लागू होते.
शाखेतील कॅश व्यवहाराचे नियम?
चार मोफत व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये.
रकमेची मर्यादा -
1 लाख रुपयापर्यंतचे दरमहा कॅश व्यवहार मोफत. त्यानंतर प्रत्येक 1 हजार रुपयांसाठी 5 रुपये किंवा एकूण 150 रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढे शुल्क घेतले जाईल.
जर रोख रकमेचे व्यवहार तुमची मूळ शाखा (होम ब्राँच) सोडून दुसरीकडे केले तर जास्त शुल्क लागू होते. 25 हजारांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करत असाल तर 1000 रुपयांमागे 5 रुपये शुल्क किंवा 150 रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढे शुल्क लागू होईल.
ICICI बँकेच्या ATM मधील व्यवहाराचे नियम
ATM च्या 5 मोफत व्यवहारानंतर 21 रुपये प्रति व्यवहार शुल्क आकारले जाईल. पहिल्या पाच व्यवहारांमध्ये एटीएममधून पैसे काढणे, बॅलन्स चेक करणे, बँक स्टेंटमेंट काढणे या सर्वांचा समावेश आहे.
ICICI बँकेच्या ATM व्यतिरिक्त इतर ATM मधून केलेल्या व्यवहारासाठी नियम
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या 6 मेट्रो शहरांमध्ये पहिले 3 ATM व्यवहार मोफत असतील. त्यानंतर जर तुम्ही पैसे काढत असाल तर प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपये आणि इतर सेवा जसे की बॅलन्स चेक करणे, स्टेटमेंट काढत असाल तर त्यासाठी 8.5 रुपये प्रति ट्रॅन्झॅक्शन चार्ज लागू होईल.
वरील सहा मेट्रो शहरे वगळता इतर शहरांमध्ये 5 ATM चे व्यवहार मोफत असतील. त्यानंतर पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये शुल्क लागेल. आणि बॅलन्स तपासणे, मिनी स्टेटमेंटच्या नॉन-फायनान्स व्यवहारावर 8.5 रुपये शुल्क लागू होईल.
ICICI बँकेचे 6 मेट्रो शहरे वगळून इतर ठिकाणी दरमहा 5 मोफत एटीएमचे व्यवहार करता येतील. तर 6 मेट्रो शहरात फक्त 3 व्यवहार मोफत आहेत.
डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 150 रुपये आहे तर ग्रामीण भागात हे शुल्क 99 रुपये आहे.