राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाद्वारे राज्यातील दारिद्यरेषेखालील कुटुंबांतील किशोरवयीन मुलींसाठी किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आली. दारिद्र्य रेषेखालील किशोरवयीन मुलींच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या शारीरिक, मानसिक व शैक्षणिक विकासासाठी ही योजना सुरू केली. 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींना या योजने अंतर्गत संतुलित आहार, सुदृढ आरोग्याद्वारे या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील यासाठी त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या योजनेसाठी नोंदणी कशी करावी? यासाठी काय नियम आहेत. याची माहिती या लेखातून घेणार आहोत.
किशोरी शक्ती योजनेशी उद्दिष्ट्ये
11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींचे पोषण व आरोग्य सुधारणे.
मुलींना घरगुती व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे.
आर्थिक दृष्ट्या मुलींना सक्षम करणे.
मुलींची निर्णयक्षमता वाढविण्याच्यादृष्टीने त्यांना अनौपचारिक शिक्षण देणे.
स्वत:च्या आरोग्यबरोबरच गृह व्यवस्थापन, बाल संगोपन, व्यक्तिगत व परिसराची स्वच्छता राखणे.
किशोरी शक्ती योजनेची नोंदणी अशी होते
या योजनेसाठी कुठलाही अर्ज भरावा लागणार नाही किंवा कुठेही नोंदणी करावी लागणार नाही. यासाठी राज्यातील प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कुटुंबातील मुलींची माहिती घेऊन त्यातून मुलींची योजनेसाठी निवड करणार आहेत. निवड झालेल्या मुलींना राज्य सरकारकडून मोफत प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना अंगणवाडीतून आरोग्य कार्ड देण्यात येते. तसेच त्यांची वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी केली जाते.
निवड झालेल्या मुलींना खालील कागदपत्रे जमा करावी लागतात.
ओळखपत्र म्हणून आधार कार्ड
जन्म दाखला
दारिद्र्यरेषेखालील कार्ड
जातीचा दाखला
शाळा दाखल्याचा दाखला