Loan Against Car: घरातील सोने तारण ठेवून तुम्हाला कर्ज मिळू शकते. स्थावर मालमत्ता जसे की घर, बंगाल, जमीन तारण ठेवूनही कर्ज मिळते हे सर्वांना माहिती आहे. मात्र, तुमची कार तारण ठेवूनही तुम्ही कर्ज मिळवू शकता. कारण, पैशांची गरज कधी लागेल सांगता येत नाही. गुंतवणूक केलेले पैसे ऐनवेळी काढून नुकसान होण्यापेक्षा कारवर तारण कर्ज घेऊन तुमचे काम होऊ शकते. नक्की कसे दिले जाते हे कर्ज पाहूया.
50 लाखापर्यंत मिळू शकते कारवर लोन
विविध बँका कारच्या मूल्याच्या 200% पर्यंतही कर्ज देतात. तसेच कर्जाची रक्कम 50 लाख रुपयापर्यंत मिळू शकते. (What is loan against car) तुमच्याकडे जर महागडी कार असेल आणि आर्थिक अडचणीत आला तर या कर्जासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. विविध बँका 13.75 वार्षिक व्याजदराने कारवर लोन देतात. तसेच कर्ज फेडण्यास 1 ते 7 वर्ष मिळू शकतात. EMI द्वारे तुम्हाला कर्ज फेडता येईल.
IDFC बँकेची ऑफर काय?
IDFC बँक कारवर 14.9% पासून पुढे कर्ज देते.
कर्जफेडीचा कालावधी 60 महिन्यांपर्यंत म्हणजेच 5 वर्षापर्यंत.
24 तासात कर्ज मंजूर होऊ शकते, असा दावा बँकेने केला आहे.
कारच्या किंमतीच्या 200% कर्ज मिळू शकते.
30 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
IDFC बँक संकेतस्थळ किंवा अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज केल्यानंतर बँकेकडून मेलद्वारे उत्तर येईल.
कार तारण लोनसाठी कोणती कागदपत्रे लागू शकतात?
ओळखपत्र (पॅनकार्ड/ आधारकार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट)
कारचे RC बुक आणि विमा कागदपत्रे
नोकरी करत असाल तर तीन महिन्याची सॅलरी स्लीप
EMI भरण्यास ऑटो डेबिट सेटअप करण्यासाठी नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डची माहिती
सहा महिन्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट
कार लोन देणाऱ्या वित्तसंस्था कोणत्या?
देशातील आघाडीच्या बँका कार तारण कर्ज देतात. (Loan against Car Offer) एचडीएफसी बँक, बजाज फेनसर्व्ह, अॅक्सिस बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, महिंद्रा फायनान्ससह इतरही बँका कार तारण कर्ज देतात. बँकेशी संपर्क साधून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. तसेच पैसाबाझार, बँकबाझार सारख्या लोन अॅग्रिगेटर संकेतस्थळावर जाऊन ऑफर पाहू शकता. व्याजदर, कर्ज कालावधी, कागदपत्रे याबाबतची माहिती एकाच ठिकाणी मिळेल.