MNREGA: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत बनवलेल्या जॉब कार्डबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. त्यामुळे अजूनही अनेकांना त्याचा लाभ घेता आलेला नाही. ग्रामीण भागातील लोकांसाठी जॉब कार्डची माहिती असणे आवश्यक आहे. पंचायत स्तरावर रोजगार मिळवायचा असेल तर जॉब कार्ड महत्वाचे आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची मनरेगा योजना आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण विकास आणि अकुशल मजुरांचा आर्थिक स्तर वाढवणे हा आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात मोठ्या रकमेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमध्ये लागणारे जॉब कार्ड काय आहे? त्याचा काय उपयोग होतो जाणून घेऊया.
जॉब कार्ड म्हणजे काय?
जॉब कार्ड हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) अंतर्गत बनवलेले कार्ड आहे, ज्याद्वारे ते प्रत्येक आर्थिक वर्षात कोणतेही काम (गावातील झाडांना पाणी देणे,वृक्षारोपण करणे) करण्यास इच्छुक असलेल्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देते. मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये काम करण्यासाठी किंवा काम मागण्यासाठी पंचायत स्तरावर जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
जॉब कार्ड लोकांना काम करण्याच्या अधिकाराची हमी देते. नरेगा अंतर्गत केलेल्या कामात सहभागी असलेल्या कुटुंबाचे डिटेल्स जॉब कार्ड क्रमांकावर नमूद केलेले असतात. म्हणजे त्याने किती दिवस काम केले, त्याला एकूण किती वेतन मिळेल, याची संपूर्ण माहिती त्याच्या जॉबकार्डमध्ये नोंदवली जाते.
जॉब कार्ड कसे मिळवायचे?
जॉबकार्ड मिळवण्यासाठी पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो. तुम्ही साध्या कागदावर लिहूनही अर्ज सादर करू शकता. अर्ज तपासल्यानंतर अर्जदाराला जॉबकार्ड दिले जाते. जॉब कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे..
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड मतदार ओळखपत्र
जॉब कार्डसाठी अर्ज कसा करावा?
- जॉब कार्ड अर्ज साध्या कागदावरसुद्धा करू शकता.
- त्यानंतर पंचायत कार्यालयामधून मधून फॉर्म मिळतो.
- फॉर्ममध्ये अर्जदाराचे नाव आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती लिहावी लागते.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून खाली तुमची सही किंवा अंगठा द्यावा लागतो.
- अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडा.
- जॉब कार्ड तुमच्या पंचायत कार्यालयात मिळवण्यासाठी अर्ज सबमिट करा.
- स्क्रीनिंग कमिटी तुमच्या तुमच्या अर्जातील डिटेल्स चेक करतील.
- अर्ज योग्य आढळल्यास आणि कागदपत्रे पूर्ण असल्यास, तुम्हाला 30 दिवसांत जॉब कार्ड मिळेल.