Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Loan Offer: चांगल्या सिबिल स्कोअरचा फायदा घ्या! महाराष्ट्र बँकेची कार लोन ऑफर चेक करा

maharashtra bank car loan rate

Image Source : www.bankofmaharashtra.in/www.godigit.com

नवी कार घ्यायचा विचार करताय? मात्र, कोणती बँक स्वस्तात कर्ज देतेय या शोधात आहात. तर महाराष्ट्र बँकेची कार लोन ऑफर पाहा. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर 8.70% व्याजदराने कर्ज मिळू शकते. सिबिल स्कोअर नुसार किती व्याजदर लागू होईल ते तपासा.

Maharashtra bank car loan: महाराष्ट्र बँकेकडून कार लोनवर चांगल्या ऑफर देण्यात येत आहेत. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला 8.70% व्याजदराने कर्ज मिळू शकते. कमी व्याजदर म्हणजे इएमआयही कमी. तसेच कारच्या 90% किंमतीपर्यंत कर्ज मंजूर होते. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

महाराष्ट्र बँक कार लोनचे फायदे?

कॉर्पोरेट सॅलरी खाते किंवा बँकेकडून आधीपासून गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना व्याजदरावर .25% सूट मिळेल. (maharashtra bank car loan) तसेच मुदतपूर्व कर्जफेड केल्यास कोणताही दंड नाही. 

झिरो प्रोसेसिंग फी, कोणतेही छुपे शुल्क नाही. जशी कर्जाची रक्कम कमी होत जाईल त्यानुसार व्याजदर आकारला जाईल. ऑनलाइन अप्लाय आणि जलद कर्जाची रक्कम मंजूर केली जाते. 

इलेक्ट्रिक कार खरेदीवर .25% व्याजदर सूट मिळू शकते. 

bank-of-maharashtra-interest-rates-for-car-loans-2.png

कार लोनसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

दोन पासपोर्ट साइझ फोटो. मतदान कार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, कंपनीचे ओळखपत्र यापैकी एक कोणतेही. 

रहिवासी पुराव्यासाठी वीज बील, टेलिफोन बील, आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक. 

पगारदार ग्राहकांना मागील तीन महिन्यांची सॅलरी स्लीप द्यावी लागेल. (maharashtra bank car loan) दोन वर्ष आयटीआर भरल्याचा पुरावा. सॅलरी खात्याचे मागील सहा महिन्याचे स्टेटमेंट. 

बिगर पगारदार व्यक्तींसाठी मागील तीन वर्षांचा आयकर रिटर्न भरल्याचा पुरावा. व्यवसाय, उद्योग असेल तर कंपनी परवाना. एक वर्षाचे बँक स्टेटमेंट, कर नोंदणी पुरावा. यासह बँक मागेल ती अतिरिक्त कागदपत्रे द्यावी लागतील. 

दुचाकी आणि जुन्या करासाठी कर्ज

जर तुम्हाला दुचाकी आणि सेकंड हँड कार घ्यायची असेल तरीही महाराष्ट्र बँकेकडून कर्ज दिले जाते. मात्र, यासाठी व्याजदर जास्त आहे.