Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Index म्हणजे काय? तो कसा मोजला जातो?

What is Index

What is Index : इंडेक्स ही एक पद्धती आहे; जिचा वापर करून कोणत्याही अॅसेटच्या परफॉर्मन्सबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला मिळते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (Bombay Stock Exchange-BSE) सेन्सेक्स (Sensex) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (National Stock Exchange-NSE) निफ्टी (Nifty) हे दोन निर्देशांक (Index) प्रसिद्ध आहेत.

आज मार्केट कसं होतं? असा जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर आपण काय करतो? शेअर मार्केटमधल्या सगळ्या कंपन्यांचे शेअर्स पाहून त्यांच्या किमती पाहून त्याची सरासरी काढून आज मार्केट पडतंय किंवा आज मार्केट वर जाईल, असे उत्तर देतो. किंवा काहीवेळेस एवढी हजामत करण्यापेक्षा आपण सेन्सेक्स किंवा निफ्टीचा निर्देशांक पाहतो आणि सांगतो की सेन्सेक्स (Sensex) पडतोय म्हणजे मार्केटसुद्धा पडणार किंवा निफ्टी (Nifty) वर जातोय म्हणजे, मार्केटसुद्धा वर जाईल. संपूर्ण मार्केटचा आढावा घेण्यासाठी आपण ज्या सेन्सेक्स आणि निफ्टीची किंमत बघतो ते नक्की काय आहेत? सेन्सेक्स आणि निफ्टी या कंपनी आहेत का? कंपनी असतील तर मग त्या कुठे आहेत आणि कंपनी नसतील तर मग ते शेअर मार्केटमध्ये कशा दिसतात? असे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्यला इंडेक्स म्हणजे काय? (What is Index?) हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात इंडेक्स म्हणजे नक्की काय?

इंडेक्स म्हणजे काय? What is Index?

इंडेक्स ही एक पद्धती आहे; जिचा वापर करून कोणत्याही अॅसेटच्या परफॉर्मन्सबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला मिळते. इंडेक्स हे मार्केटमधील ठराविक गोष्टींची माहिती देण्याचे काम करतात. सेन्सेक्स व निफ्टी यांसारखे इंडेक्स संपूर्ण मार्केटची माहिती देतात. बॅंक निफ्टीसारखे इंडेक्स मार्केटच्या ठराविक सेक्टरची माहिती देतात. इंडियन शेअर मार्केटमध्ये असे भरपूर इंडेक्स आहेत; पण त्यापैकी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (Bombay Stock Exchange-BSE) सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (National Stock Exchange-NSE) निफ्टी हे दोन निर्देशांक (Sensex & Nifty) प्रसिद्ध आहेत. इंडेक्स केवळ मार्केटपर्यंतच मर्यादित नसतात. त्यांचा वापर इतर आर्थिक डेटा जसे की व्याज दर, चलनवाढ किंवा उत्पादन इत्यादींसारख्या घटकांची माहिती मिळवण्यासाठी देखील केला जातो.


इंडेक्सची गरज काय? What is the Use of Index?

स्टॉक्स निवडण्यात मदत

शेअर मार्केटमध्ये हजारो कंपन्या लिस्टेड आहेत. त्यातून चांगला स्टॉक शोधून काढणे, त्याच्या परफॉर्मन्सचा अभ्यास करणे, त्यानंतर त्यात ट्रेडिंग (Trading) करणे अवघड काम आहे. कोणत्याही बेंचमार्कशिवाय स्टॉक्सची ही निवडणूक लढवणे खरंच खूप अवघड काम आहे. अशा परिस्थितीत इंडेक्स आपले काम सोपे करून देतात. इंडेक्स कंपन्यांचे वर्गीकरण अनेक भागांमध्ये करतात जसे की कंपनीची साईज, कंपनीचे सेक्टर इत्यादी. या वर्गीकरणामुळे आपले काम हलके होते व स्टॉक्स निवडण्यासाठी मदत होते.

इंडेक्स प्रतिनिधीचे काम करतात

प्रत्येक सेक्टरमधल्या प्रत्येक कंपनीचा अभ्यास करून ट्रेडिंग करणे थोडे किचकट काम आहे. इंडेक्स ट्रेडर्सना कंपन्यांचा अभ्यास करण्यात मोठी मदत करतात. एखादा इंडेक्स मार्केटमधल्या ट्रेंडला म्हणजेच एकूण परिस्थितीला दर्शवण्याचे काम करतो. ज्यामुळे त्या इंडेक्समधल्या कंपन्यांबद्दलची मोठी माहिती ट्रेडर्सना मिळू शकते. उदाहरणार्थ, फार्मा सेक्टरचा इंडेक्स संपूर्ण फार्मा सेक्टरचे प्रतिनिधित्व करत फार्मा सेक्टरमधल्या कंपन्या कशा परफॉर्म करतात हे सांगतो. त्यामुळे इन्वेस्टर्सना गुंतवणूक करताना मोठी मदत होते. 

इंडेक्स तुलना करण्यास उपयोगी ठरतात

अनेकवेळा जेव्हा आपल्याला ट्रेड मधून फायदा होतो किंवा तोटा होतो. तेव्हा तो किती गंभीर आहे हे समजत नाही. आपण जरी त्यातून पैसे कमावले किंवा गमावले असले तरी जोवर दुसऱ्या कोणत्या गोष्टीशी त्याची तुलना केली जात नाही. तोवर त्यातून मिळालेला फायदा व तोट्याचे मूल्यमापन करता येत नाही. पोर्टफोलिओमधली ही तुलना करण्यासाठी इंडेक्सचा वापर केला जातो. स्टॉक घेताना जर तो इंडेक्सच्या खाली असेल व विकताना इंडेक्सच्या वर विकला गेला असेल तर त्या स्टॉकने चांगला परफॉर्मन्स दिलाय हे समजते. पण जर स्टॉक घेतानाही इंडेक्सच्या खाली असेल व विकतानाही इंडेक्सच्या खालीच असेल तर मग जरी तुम्हाला फायदा झाला असला तरी स्टॉकचा परफॉर्मन्स चांगला नव्हता, असे मानले जाते. मार्केटमध्ये एक प्रसिद्ध स्ट्रॅटेजी आहे; ज्यात असे सांगितले आहे की, ट्रेडर्सनी इंडेक्सच्या परफॉर्मन्सवर मात करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याच परफॉर्मन्सची प्रतिबिंब उमटवले पाहिजे. 

इंडेक्स तयार कसे करतात?

शेअर मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हे इंडेक्स तयार करण्यासाठी एकसारख्या कंपन्यांना गोळा केले जाते. गोळा केलेल्या या कंपन्यामध्ये बाजार भांडवलीकरण, कंपनीची साईझ आणि त्यांची इंडस्ट्री आदी घटकांमध्ये साम्य असते. निवडलेल्या प्रत्येक स्टॉकची किंमत वेगवेगळी असते व ती नेहमी बदलत असते. या सर्व कंपन्यांची किंमत एकत्रित केल्यानंतर इंडेक्सची किंमत ठरवली जाते व ती डिस्प्ले केली जाते. किंमत ठरल्यानंतर इंडेक्स मधल्या प्रत्येक स्टॉकला ठराविक वजन दिले जाते. हे वजन, एखाद्या स्टॉकमुळे इंडेक्सच्या किंमतीत किती फरक होतो हे दर्शवते. अशाप्रकारे इंडेक्स तयार केले जातात व त्यांची किंमत ठरवली जाते.

इंडेक्सवर ट्रेडिंग करू शकतो का?

नाही. इंडेक्स हे मार्केट दर्शवण्यासाठी तयार केले जातात. त्यामुळे त्याची ट्रेडिंग होऊ शकत नाहीं. तुम्ही त्या इंडेक्स मध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता परंतु थेट इंडेक्स विकत घेणे किंवा विकणे अशक्य आहे. असे असूनही इंडेक्सची फ्युचर्समध्ये ट्रेडिंग केली जाऊ शकते. ज्यासाठी तुम्हाला फ्युचर्सचे ज्ञान असणे महत्वाचे आहे.