आयसीआरए संस्थेची स्थापना 1991 मध्ये झाली असून, त्याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. सुरूवातीला याचे नाव इन्वेस्टमेंट इनफॉर्मेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी क्रेडिट रेटिंग एजन्सी (Investment information and Credit Rating Agency-IICRA) होते. पण एप्रिल 2007 मध्ये त्याचे नाव बदलून ICRA Limited असे करण्यात आले. त्याचबरोबर या कंपनीचे बीएसई आणि एनएसईमध्ये लिस्टिंग देखील करण्यात आले. ही कंपनी आपल्या पारदर्शक सिस्टिमच्या आधारे आर्थिक व्यवहारातील विविध सेक्टरमध्ये रेटिंगची सेवा पुरवते. ICRA खालील प्रकारच्या रेटिंग सुविधा पुरवते.
- बँक लोन क्रेडिट रेटिंग
- कॉर्पोरेट लोन रेटिंग
- कॉर्पोरेट गव्हर्नंस रेटिंग
- फायनान्शिअल सेक्टर रेटिंग
- इशुअर रेटिंग
- इन्फ्ट्रास्ट्रक्चर सेक्टर रेटिंग
- इन्शुरन्स सेक्टर रेटिंग
- म्युच्युअल फंड रेटिंग
- पब्लिक फायनान्स रेटिंग
- प्रोजेक्ट फायनान्स रेटिंग
- स्ट्रक्चर फायनान्स रेटिंग
- एसएमई रेटिंग
क्रेडिट रेटिंग बिझनेसमधील सुरूवातीच्या टप्प्यातील ही सर्वांत जुनी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. आयसीआरए ही प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या, व्यावसायिक बँका, नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या, फायनान्स संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील विविध उपक्रम आणि महापालिकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या योजनांचे रेटिंग करते.
Table of contents [Show]
ICRA ची वैशिष्ट्ये
- ICRA हा एक ग्रुप ऑफ कंपन्यांचा भाग आहे. यामध्ये इतर उपकंपन्याही आहेत.
- आयसीआरए ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ती बीएसई आणि एनएसईमध्ये लिस्टेड आहे.
- ही भारतातील एक नामांकित क्रेडिट रेटिंग कंपनी आहे.
- आयसीआरएमध्ये इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेस (Moody's Investor Service) ही एक मुख्य भागधारक कंपनी आहे.
क्रेडिट रेटिंग ही एक पतमापन करणारी यंत्रणा आहे. जसे की, एखादी व्यक्ती किंवा कंपनी कर्जाच्या करारानुसार वेळेवर कर्ज फेडण्यास सक्षम आहे का? याचे रेटिंग ठरवते. या रेटिंगच्या आधारावर बँका कर्ज देतात. यात प्रामुख्याने कर्ज घेणारी व्यक्ती हिचा आर्थिक इतिहास कसा आहे, हे तपासले जाते. त्याने यापूर्वी घेतलेले कर्ज वेळेत फेडले आहे का? कर्जाचे हप्ते कधी चुकवले आहेत का? एकूणच त्याच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा क्रेडिट रेटिंगमधून मांडला जातो.
भारतात अशा क्रेडिट रेटिंग तपासणाऱ्या 5-6 कंपन्या आहेत. ज्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि कंपन्यांचे आर्थिक मूल्यांकन करतात. या मुल्यांकनाच्या आधारावर बँका कर्ज देतात किंवा क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देतात. अशा कंपन्यांमधील ICRA ही एक कंपनी आहे. आयसीआरए सोबतच CRISIL, CARE, ONICRA, SMERA आणि Brickwork Rating कंपनी आहे.
ICRA ही भारतीय कंपनी आहे का?
होय, ICRA ही एक भारतीय कंपनी आहे. ती गुंतवणूकबाबतची व्यावसायिक माहिती देणारी क्रेडिट रेटिंग देणारी एजन्सी आहे.
ICRA ही कंपनी सरकारी आहे की खाजगी?
ICRA ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर (BSE & NSE) लिस्टिंग असलेली कंपनी आहे.
क्रिसिल आणि आयसीआरए म्हणजे काय?
CRISIL आणि ICRA या क्रेडिट रेटिंग देणाऱ्या भारतातील नामांकित कंपन्या आहेत.
भारतातील सर्वांत मोठी क्रेडिट रेटिंग कंपनी कोणती?
क्रिसिल (Credit Rating Infromation Services of India Limited-CRISIL) हा भारतातील सर्वांत मोठी रेटिंग एजन्सी आहे. या कंपनीचा क्रेडिट रेटिंगमधील भारतीय बाजारातील 65 टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा आहे.