आरोग्य विमा (Health Insurance) हे अनपेक्षित वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारे एक महत्त्वाचे साधन आहे. सामान्यत:, तुम्ही आजारी किंवा जखमी झाल्यावर तुमच्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चास कव्हर करण्यासाठी पॉलिसीचा उपयोग होतो. विमा क्षेत्रात आता प्रत्येकासाठी विविध प्रकारचे आरोग्य विमा उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे ग्रुप हेल्थ इन्शुरन्स (Group Health Insurance) हा देखील एक खास कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेला विमा प्रकार आहे. आज आपण ग्रुप हेल्थ इन्शुरन्स याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
ग्रुप /कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स Health Insurance
एखाद्या संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संस्थेकडून विमा (Insurance) काढला जातो. त्याला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स (Group Health Insurance) म्हटले जाते. या विमा प्रकारास कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स (Corporate Health Insurance) म्हणून देखील ओळखले जाते. कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी हा विम्याचाच एक प्रकार आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आजारपण,अपघात आणि इतर आरोग्य समस्या अधोरेखित करून विमा सुरक्षा कवच दिले जाते. यामध्ये संस्थेच्या अंतर्गत काम करणार्या व्यावसायिकांच्या गटाचा समावेश होतो. कॉर्पोरेट आरोग्य विमा ही मुळात एक ग्रुप आरोग्य विमा योजना आहे. ज्यात अनेक कर्मचार्यांचा विमा उतरवला जातो.
ग्रुप विमा आणि वैयक्तिक आरोग्य विमा फरक
कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज कर्मचार्यांच्या गटाला ऑफर केले जाते, तर वैयक्तिक आरोग्य विमा संरक्षण एका व्यक्तीला दिले जाते, मग ते कामावर असले किंवा नसले तरीही चालते. तसेच, कॉर्पोरेट पॉलिसीच्या बाबतीत, कव्हरेज सामान्यत: कव्हर केलेला कर्मचारी कंपनीचा कर्मचारी असेपर्यंत वैध राहतो, अथवा त्या कर्मचाऱ्याला पॉलिसीची मुदत संपेपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते. वैयक्तिक आरोग्य विमा योजनेच्या तुलनेत कॉर्पोरेट आरोग्य विम्याची व्याप्ती मर्यादित आहे. इथे वैयक्तिक आरोग्य विमा स्वखर्चातून घ्यावा लागतो. तर ग्रुप विमा हा कंपनीच्या पैशातून प्राप्त होतो.
ग्रुप किंवा कॉर्पोरेट विम्याचे फायदे -
काही कंपनी आपली उच्च प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी म्हणून कर्मचाऱ्यांना एक मूलभूत आरोग्य योजना प्रदान करत होत्या. दरम्यान, कोविड-19 सारख्या जागतिक साथीची दखल घेत भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने (Insurance Regulatory and Development Authority of India-IRDAI) ने कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विम्याबाबत अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुरेशा विम्याच्या रकमेसह सर्वसमावेशक आरोग्य विमा प्रदान करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कंपन्यांकडून ग्रुप आरोग्य विमा देण्यास सुरुवात झाली.
कंपनीसाठी कॉर्पोरेट विमा कमी खर्चात उपलब्ध होतो. त्याच बरोबर कर कपातीत कंपनीचा देखील फायदा होतो. कंपनीकडून बऱ्याचदा इतर सुविधा या नावाखाली हा विमा कर्मचाऱ्यांना दिला जातो. मात्र या विम्याचा खर्च कंपनी उचलत असल्याने कर्मचाऱ्याला त्याचा अधिक फायदा होतो. ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही विमा कव्हर प्राप्त होतो.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?
कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप मेडिकल कव्हर मोफत उपलब्ध आहे, त्यामिळणाऱ्या बहुतांश सुविधा या उच्च दर्जाच्या असू शकतात. बहुतेक कर्मचारी आरोग्य योजनामध्ये खालील गोष्टी कव्हर केल्या जातात.
- वैयक्तिक अपघात कव्हर
- हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी कव्हर
- प्रतीक्षा कालावधी नाही
- COVID-19 कव्हर
- वैद्यकीय तज्ञांशी ऑनलाईन संपर्क आणि आजाराबाबत निदान
- लॅब चाचण्या बुक करण्याची सुविधा (नियम अटीसह)
- कॅशलेस हॉस्पिटल उपलब्ध
- कुटुंबातील सदस्यांचा देखील पॉलिसीमध्ये समावेश