What is Financial Year: आजपासून (1 एप्रिल) नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. हे आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत असेल. उद्योग जगत, सरकारसाठी हा महत्त्वाचा दिवस. विविध सरकारी विभाग, करदाते आणि करदात्यांची मार्च एंडसाठीची धावपळ तुम्ही एव्हाना पाहीलीच असेल. पण कधी हा विचार केला आहे का? आर्थिक वर्ष 1 एप्रिलला का सुरू होते आणि 31 मार्चला संपते.
ब्रिटिश काळापासून चालत आलेली परंपरा (Financial Year practice from Britesh Era)
भारतामध्ये ब्रिटिशकालापासून आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासूनच सुरू होते. त्यामागे भौगोलिक कारणेही आहेत. भारत पूर्वीपासून कृषिप्रधान देश आहे. रब्बी हंगामातील पिकांची कापणी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात होते. त्यामुळे किती उत्पन्न झाले, सरकारकडे किती महसूल जमा होईल, याचा अंदाज सरकारला बांधता येत असे. त्यामुळे रब्बी हंगामानंतर 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होत असे. ब्रिटिशांनी जी पद्धत सुरू केली ती अद्यापही भारतात सुरू आहे. सोबतच हिंदू नववर्ष पुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र महिन्यापासून सुरू होते. या काळात शरद ऋतूनंतर वसंत ऋतू सुरू होतो. याचा संबंधही आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होण्यामागे आहे.
कृषी उत्पन्नांचा अदांज (Crop Cycle)
फेब्रुवारी-मार्च महिन्यात जर शेतीचे उत्पन्न जास्त झाले तर त्यानुसार सरकारला महसूल किती जमा होईल याचा अंदाज येतो. तसेच जर कृषी उत्पन्न कमी झाले तर पुढील वर्षातील खर्चाचे आणि उत्पन्नाचे गणित मांडता येते. कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांवर परिणाम होतो. मार्चनंतर सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात सरकारचे उत्पन्न घटेल किंवा वाढेल, याचा अंदाज सरकारला येतो. ब्रिटिशांच्याही आधी भारतामध्ये 1 मे ते 30 एप्रिल असे आर्थिक वर्ष पाळले जात होते. मात्र, नंतर ब्रिटिशांनी यामध्ये बदल केले.
देशातील मोठे सण-उत्सव (big Festival in India)
भारतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, नवरात्रसारखे मोठे सण असतात. हिंदू धर्मातील हे महत्त्वाचे उत्सव असल्याने बाजारातील उलाढालही मोठी असते. तसेच त्यानंतर डिसेंबर महिन्यात ख्रिसमसही असतो. व्यापारी, उद्योजक या काळात व्यस्त असतात. बाजार गर्दीने फुलून गेलेले असतात. जर आर्थिक वर्ष डिसेंबर महिन्यात संपत असते तर या काळात सर्व व्यवहाराची आकडेमोड करण्यास उद्योगांना कमी वेळ मिळाला असता. त्यामुळे सर्वांसाठी सोईचा मार्च हा महिना ठेवण्यात आला आहे.
राज्यघटनेत आर्थिक वर्षाबाबत तरतूद आहे का? (What constitution says about financial Year)
आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असावे, असे भारतीय राज्यघटनेत कोठेही लिहलेले नाही. मात्र, ही परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू करावे असे 1897 साली आणलेल्या जनरल प्रोव्हिडज अॅक्टमध्ये म्हटले होते. ही प्रथा अजूनही सुरू आहे. नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर बजेटमध्ये घेतलेले आर्थिक निर्णयही एप्रिलपासून लागू होतात. खासगी उद्योगही आपल्या व्यवसायाचा नफा, तोटा, विक्री टार्गेट्स याच कालावधीत मोजतात. त्यानुसार पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन करतात. फक्त भारतच नाही तर कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलँड, हाँगकाँग, जपान या देशांमध्येही आर्थिक अशाच पद्धतीने सुरू होते.