Finance Commission: भारतीय राज्यघटनेतील कलम 280 अनुसार वित्त आयोगाची नेमणूक ही भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते. वित्त आयोग (Finance Commission) हा सूक्ष्म पद्धतीने आर्थिक नियोजन करणारा एक आयोग आहे. या आयोगाची स्थापना सर्वप्रथम डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी 1951 मध्ये केली होती. या आयोगाचा कालावधी 5 वर्षांचा असतो. तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधील आर्थिक संबध प्रसारित करण्याचे काम करतो. 1951 पासून 2017 पर्यंत 15 वित्त आयोग नेमण्यात आले. या आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग हे होत.
Table of contents [Show]
- वित्त आयोग म्हणजे काय? What is Finance Commission?
- वित्त आयोगाची स्थापना कोण करते? Who constitutes the Finance Commission?
- वित्त आयोगाचा कालावधी किती असतो? Tenure of Finance Commission?
- पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? | First Finance Commission Chairman
- 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य | 15th Finance Commission Chairman & Members
- 15 व्या वित्त आयोगामध्ये कोणत्या वर्षांचा सहभाग करण्यात आला?
वित्त आयोग म्हणजे काय? What is Finance Commission?
वित्त आयोग ही एक सांविधानिक संस्था आहे. ज्याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 अनुसार केली जाते. ही संस्था केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील घटनात्मक व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतील घडामोडींनुसार टॅक्सची रक्कम वितरित करण्याची पद्धती आणि सूत्र ठरवण्याचे काम करते.
वित्त आयोगाची स्थापना कोण करते? Who constitutes the Finance Commission?
वित्त आयोगाची स्थापना भारताचे राष्ट्रपती हे घटनेतील तरतुदीनुसार करतात. राष्ट्रपतींनी पाच वर्षांच्या अंतराने किंवा त्यापूर्वी वित्त आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे. दर 5 वर्षांच्या अंतराने राष्ट्रपतींनी वित्त आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे.
वित्त आयोगाचा कालावधी किती असतो? Tenure of Finance Commission?
वित्त आयोगाचा कालावधी साधारण 5 वर्षांचा असतो. सर्वांत पहिला वित्त आयोग 1951 मध्ये स्थापन करण्यात आला होता. आतापर्यंत एकूण 15 वित्त आयोगांची स्थापना करण्यात आली. 15 व्या वित्त आयोगाची स्थापना 2017 मध्ये करण्यात आली होती. भारतीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य एन. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 15 व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली.
पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? | First Finance Commission Chairman
भारताचा पहिला वित्त आयोग 6 एप्रिल, 1952 मध्ये के सी नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता. भारताचे राष्ट्रपती यांनी 1952-57 या कालावधीसाठी पहिला वित्त आयोग स्थापन केला होता. त्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून के सी नियोगी यांनी काम पाहिले.
15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य | 15th Finance Commission Chairman & Members
वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक सचिव आणि 4 सदस्य असतात. त्यापैकी दोन सदस्य पूर्णवेळ म्हणून तर दोन सदस्य अर्धवेळ काम करतात. 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के सिंग (N K Singh, Chairman) आणि सचिव अरविंद मेहता (Arvind Mehta, Secretary) आहेत. तर शक्तीकांत दास (Shaktikanta Das), अनूप सिंग (Anoop Singh), रमेश चंद (Ramesh Chand) आणि अशोक लाहिरी (Ashok Lahiri) हे सदस्य आहेत.
15 व्या वित्त आयोगामध्ये कोणत्या वर्षांचा सहभाग करण्यात आला?
15 व्या वित्त आयोगामध्ये 2021-22 ते 2025-26 असा 5 वर्षांच्या कालावधीचा समावेश करण्यात आला आहे.