इबिटा (EBITDA) म्हणजे काय? तुम्हाला हा शब्द ऐकून थोडे विचित्र वाटले असेल ना! पण इबिटा ही फायनान्समधली खूपच महत्त्वाची टर्म आहे. इबिटाच्या मदतीने कोणत्याही कंपनीची आर्थिक स्थिती जाणून घेता येते. एखादी कंपनी तिमाही, सहामाही अहवालाचे निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर करत असेल तर ते इबिटामधून समजते. त्यामुळे कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीचा इबिटा माहित असणे आवश्यक आहे.
इबिटा म्हणजे अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डिप्रिसिएशन अँड अॅमार्टिझेशन (Earnings Before Interest, Taxes and Amortization). सोप्या शब्दांत सांगायचे तर व्याज, टॅक्स, घट आणि कर्ज न वगळता झालेला नफा. कोणत्याही कंपनीचा व्यवसाय कसा सुरू आहे, कंपनीला किती फायदा होत आहे आणि कंपनी कर्ज फेडण्यास सक्षम आहे की नाही, याचा शोध इबिटाच्या मदतीने घेता येऊ शकतो. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचे खरे मूल्य जाणून घेणे गरजेचे आहे. या आधारावर त्या कंपनीचे शेअर योग्य भावाने खरेदी करता येऊ शकतील.
कंपनीची आर्थिक स्थिती आणि त्याची शेअर प्राईस याचा थेट संबंध असतो. कोणत्याही कंपनीचा इबिटा पाहूनच शेअरच्या योग्य किमतीचा अंदाज बांधता येतो. कंपनी व्यापार करते तेव्हा त्यापासून लाभ होतो. मात्र अनेकदा कंपनीचा खर्च आणि कर्जाचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे कंपनीचा निव्वळ नफा कमी राहतो. व्यापार चालवण्यासाठी केलेला खर्च आणि घेण्यात आलेल्या कर्जाला निव्वळ नफ्यातून वगळण्या अगोदर आणि नंतर किती फायदा राहतो, हे जाणून घेण्यासाठी इबिटाचा उपयोग केला जातो.
इबिटाचा शोध घेण्यासाठी कंपनीचे प्रॉफिट अॅण्ड लॉस स्टेटमेंट देखील पाहू शकतो. या गोष्टींचा अगोदरच समावेश केलेला असतो. मात्र आपल्याला इबिटा काढायचा असेल तर कंपनीच्या निव्वळ नफ्यातून मिळालेले व्याज आणि टॅक्स जोडायला हवे. त्यानंतर कंपनीकडून कपात केलेले मूल्य आणि कर्ज देखील जोडायला हवे. यानंतर जी रक्कम राहते, त्याला इबिटा म्हणू शकतो.
इबिटा म्हणजे काय?
इबिटाचा पूर्ण फॉम अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट टॅक्स म्हणजेच असा नफा की ज्यातून व्याज, कर कपात झालेली नसेल. कंपनीचा व्यवसाय कसा सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी इबिट महत्त्वाचे ठरते. यातून कंपनीची बेस अर्निंग्ज समजू शकते. बेस अर्निंग्ज जाणून घ्यायचे असेल तर व्याज आणि कर कपात करण्यापूर्वीचे कॅलक्युलेशन महत्त्वाचे आहे.
इबिटा मार्जिन म्हणजे काय?
एका वर्षात कंपनी किती विक्री करते आणि इबिटा ही त्याच्या विक्रीच्या किती टक्के आहे, हे जाणून घेण्यासाठी इबिटा मार्जिनचा उपयोग केला जातो. इबिटा मार्जिनला टक्क्यांच्या रुपात प्राप्त करण्यासाठी इबिटाला एकूण विक्रीने भागावे लागेल आणि त्यास 100 ने गुणल्यास मार्जिन समोर येईल.
जर इबिटा मार्जिन अधिक असेल तर त्याचा अर्थ कंपनी उत्पादने किंवा सेवा हे प्रीमियम प्राइजवर विकत असल्याचे समजावे व ही बाब कंपनी व गुंतवणूकदारांच्या फायद्याची असते.