Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

E20 पेट्रोल म्हणजे काय? नॉर्मल पेट्रोलपेक्षाही मिळते स्वस्त

E20 पेट्रोल म्हणजे काय? नॉर्मल पेट्रोलपेक्षाही मिळते स्वस्त

भारत सरकारकडून E20 पेट्रोलचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. तसेच भारतीय बाजारपेठेत इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP)वर चालणारी वाहनेदेखील दाखल होत आहेत. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. आज आपण E20 पेट्रोल म्हणजे काय आणि त्याचा वापराने इंधन खर्चामध्ये कशाप्रकारे बचत होणार आहे हे जाणून घेऊ..

भारतात पारंपरिक इंधनाचा वापर करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये अपारंपरिक उर्जा निर्मितीसह बायोइंधन निर्मितीवर सरकारकडून जास्त भर दिला जात आहे. भारत सरकारकडून  E20 पेट्रोलचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. तसेच भारतीय बाजारपेठेत इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP)वर चालणारी वाहनेदेखील दाखल होत आहेत. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. आज आपण E20 पेट्रोल म्हणजे काय आणि त्याचा वापराने इंधन खर्चामध्ये कशा प्रकारे बचत होणार आहे हे जाणून घेऊ..

E20 पेट्रोल म्हणजे काय?

E20 म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EID) हे एक प्रकारचे इंधनच आहे. यामध्ये पेट्रोलचे प्रमाण 80% आणि 20% इथेनॉलचे प्रमाण मिक्स करण्यात आलेले असते. E20 मधील 20 हा आकडा पेट्रोलमधील इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण दर्शवतो. भारतात ऊस कारखान्यातील मोलॅसिस पासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती केली जाते. सद्यस्थितीत इथेनॉलची निर्मिती जवळपास 1,300 कोटी लिटर आहे. त्यापैकी 650 लीटर उसापासून आणि उर्वरित धान्यांसह इतर स्त्रोतांकडून उपलब्ध होत आहे.  2025 पर्यंत इंधनामध्ये इथेनॉलचे 20% मिश्रण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

देशभरात 1350 पेट्रोलपंपावर उपलब्ध-


भारताने पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी जैवइंधनाचा वापर म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) वापर करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. भारताने आपले E10 लक्ष्य आधीच पूर्ण केले आहे, त्यामुळे देशात वापरल्या जाणार्‍या पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल आहे.  इथेनॉल हे कमी प्रदूषण करणारे इंधन आहे आणि ते पेट्रोलच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध होते. भारतात E20 पेट्रोल आता 1,350 पेट्रोल पंपावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच 2025 पर्यंत देशभरात हे सर्वत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय  पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे

E20 स्वस्त कसे?

वाहनांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP)चा दर कमी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इथेनॉल निर्मितीचा उत्पादन खर्च कमी आहे. त्यामुळे ते बाजारात पेट्रोलपेक्षा कमी दरात उपलब्ध होत आहे. सध्या इथेनॉलला 65 रुपये दर आहे. त्यामुळे 20 टक्के इथेनॉलचा वापर केल्यामुळे E20 पेट्रोलचा दर कमी होणार आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात बचत होण्यास मदत होणार आहे.तर  भारतात सध्या jioBP कडून  E20 इंधनाची निर्मिती केली जात असून ते दिल्लीमध्ये 87 रुपये प्रतिलिटर प्रमाणे उपलब्ध होत आहे.