Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Difference Between eRupee & Bitcoin: ई- रुपी म्हणजे काय? बिटकॉईनपेक्षा ते कसे वेगळे आहे? जाणून घ्या

Difference Between eRupee & Bitcoin

Difference Between eRupee & Bitcoin: सध्या अनेकांच्या चर्चेमध्ये eRupee आणि बिटकॉईनचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. eRupee म्हणजे नक्की काय? त्याचे फायदे काय आहेत? बिटकॉईन आणि eRupee मध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊयात.

देशाला डिजिटल  व्यवहारांकडे घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 2 ऑगस्ट 2022 रोजी डिजिटल पेमेंट सोल्युशन 'eRupee' लॉन्च केले. हे डिजिटल पेमेंटसाठी कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस इन्स्ट्रुमेंट आहे, असे म्हणायला हरकत नाही. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने eRupee ही व्हाउचर आधारित पेमेंट सिस्टीम लॉन्च केली आहे. आर्थिक सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने ही पेमेंट सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. आज आपण eRupee म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत? बिटकॉईन आणि eRupee मध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊयात.

eRupee म्हणजे काय?

eRupee हे एक प्रीपेड व्हाउचर असून याला आपण डिजिटल व्हाउचर देखील म्हणू शकतो. जे लाभार्थ्याला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा क्यूआर कोडच्या स्वरूपात प्राप्त होते. eRupee, डिजिटल रुपया आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच CBDC या तिन्ही गोष्टी एकच आहेत. तुमच्या पाकिटातील 100,200 आणि 500 रुपयांच्या नोटा ज्याप्रमाणे आरबीआयने छापल्या आहेत, अगदी त्याचप्रमाणे eRupee हे  साँवरेंन बँक चलन आहे. याचा अर्थ आरबीआय हा रुपया देखील जारी करते. आरबीआयच्या बॅलन्स शीटमध्ये  eRupee हा लायबिलिटी स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो.

सरकारला एखाद्या विशिष्ट हॉस्पिटलमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट उपचारासाठी कव्हर द्यायचा असल्यास ते भागीदार बँकेद्वारे ठराविक रकमेसाठी eRupee व्हाउचर जारी करतात. कर्मचाऱ्याला त्या फोनवर एसएमएस किंवा क्यूआर कोड स्वरूपात ते फीचर प्राप्त होते. तो व्यक्ती ठरवून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या सेवेचा लाभ घेऊ शकतो. त्याच्या फोनवर प्राप्त झालेल्या eRupee व्हाउचरद्वारे पैसे देऊ शकतो. थोडक्यात काय, तर eRupee हा एक कॅशलेस व्हाउचर आधारित पेमेंट मोड आहे. जो वापरकर्त्याला कार्ड, डिजिटल पेमेंट किंवा इंटरनेट बँकिंग शिवाय व्हाउचरची पूर्तता करण्यास मदत करतो.

फायदे जाणून घ्या

इतर डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर पेमेंट करण्यासाठी बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे असते. मात्र eRupee लाभार्थ्याला बँकेत खाते असणे आवश्यक नाही. ही एक सोपी आणि कॉन्टॅक्टलेस, द्विचरण विमोचन प्रक्रिया असून ज्यासाठी वैयक्तिक तपशील सामायिक करण्याची गरज नाही.

याचा दुसरा फायदा असा की, eRupee साध्या फोनवर देखील चालू केले जाऊ शकते  त्यासाठी स्मार्टफोन असण्याची किंवा इंटरनेट कनेक्शनची कोणती गरज नाही. हे एक प्रीपेड व्हाउचर असल्याने eRupee वापरकर्त्याला रियल टाईम पेमेंटची खात्री देते.

eRupee आणि बिटकॉईनमध्ये काय फरक आहे?

बिटकॉईन हे वीकेंद्रित चलन (Decentralized Currency) आहे. जे सार्वजनिक ब्लॉग चेनमध्ये वापरले जाते. तर eRupee हे केंद्रीकृत चलन (Centralized Currency) असून खाजगी ब्लॉकचेनमध्ये त्याचा वापर केला जातो. हा यातील सगळ्यात मोठा फरक आहे.

याशिवाय कोणतीही संस्था किंवा सरकार बिटकॉईनवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तर आरबीआय eRupee नियंत्रित करू शकते.

बिटकॉईन, इथोरीयम यासारख्या क्रिप्टोकरन्सीचे भारतात कायदेशीररित्या टेंडर नाही. मात्र eRupee देशात कायदेशीर टेंडर स्वरूपात उपलब्ध आहे.

Source: jagran.com