Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Domestic Labor Scheme : 'घरेलू कामगार योजना' म्हणजे काय? या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

Domestic Labor Scheme 2023

Image Source : www.tiruppuronline.in

Domestic Labor Scheme 2023 : 'घरेलू कामगार योजना' (Domestic Labor Scheme 2023) ही सरकारने घरगुती काम करणाऱ्या महिलांच्या हितासाठी सुरू केलेली कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा लाभ, घरातील धुणी, भांडी, स्वयंपाक, स्वच्छता आणि इतर कामे करणाऱ्या महिला घेऊ शकतात. ही योजना घरेलू कामगार मंडळाच्या वतीने राबविल्या जाते.

Who Will Benefit Of Domestic Labor Scheme : अनेक मोठमोठ्या बंगल्यांमध्ये, अनेक श्रीमंत व्यक्तींच्या घरांमध्ये धुणी, भांडी, स्वयंपाक, साफसफाई, इत्यादी कामासाठी मदतनीस असते. ज्याला सर्वसाधारणपणे मोलकरीण आणि शासकीय भाषेमध्ये घरेलू कामगार असे म्हणतात. 'घरेलू कामगार योजना'(Domestic Labor Scheme 2023) ही सरकारने घरगुती काम करणाऱ्या महिलांच्या हितासाठी सुरू केले आहे.

घरकाम करण्याऱ्या महिलेला देखील स्वत:चे कुटुंब, मूलबाळ असते. काही महिलांवर तर संपूर्ण घराची जबाबदारी देखील असते. तिला तिच्या मुलांच्या संगोपणाचा, शिक्षणाचा आणि इतरही खर्च बघावा लागतो. त्यातही तिला मिळणारे वेतन फार कमी असते. त्यामुळे या महागाईच्या काळात तिला स्वत: सह कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे फार कठीण जाते.

किती रक्कम दिली जाते?

या सगळ्या गोष्टींचा विचार करता शासनाने, अशा महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी 'घरेलू कामगार योजना' सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत घरेलू काम करणाऱ्या 30 टक्के महिलांना शासनाकडून 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय मार्च महिन्यात जाहीर करण्यात आला आहे.

या योजनेचा लाभ कोणाला मिळेल?

जेव्हा घरकाम करणारी महिला या योजनेमध्ये घरेलू कामगार म्हणून आपली नावनोंदणी करेल, तेव्हाच घरेलू कामगार योजनेचे लाभार्थी म्हणून घरेलू कामगार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

कागदपत्रांची आवश्यकता

आधार कार्ड
रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, मतदान कार्ड, वीजबील आधार कार्ड इ.
बँक खाते पासबुक
पासपोर्ट साईज दोन फोटो
महिला जिथे काम करत असेल तेथील मालकाने दिलेले प्रमाणपत्र. त्यामध्ये  ती त्यांच्याकडे कामाला आहे असे नमूद केलेले असावे.
वयाचा दाखला

नोंदणी कुठे आणि कशी करायची?

घरेलू कामगार नोंदणी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन आहे. आपल्या जिल्ह्यातील कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयामध्ये अर्ज जमा करायचा असतो. या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर त्या महिलेला पुढील बाबी पूर्ण करण्यासाठी फोन केला जाते. यासाठी महिलांना ओळखपत्राचे 30 रुपये आणि मंडळाच्या सभासदत्वाचे 60 रूपये भरावे लागतात. या योजनेची नोंदणी करताना एकच अट आहे ती म्हणजे, महिलेचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त आणि साठ वर्षांपेक्षा कमी असावे.