Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर बाजारातील Intraday आणि Investment मध्ये काय फरक आहे?

Intraday

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार सक्रिय असतात. रोज मोठ्या प्रमाणात शेअर्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. शेअर मार्केटमध्ये सक्रिय असणारे सगळे बाजाराकडे एकाच दृष्टिकोनातून पाहतात असे नव्हे. शेअर्स बाजारात सक्रिय असणाऱ्यांचे ढोबळपणे वर्गीकरण करायचे तर काही जण intraday trading करत असतात तर काही जण मार्केटकडे Investment म्हणून बघत असतात. Intraday vs investment यात काय फरक आहे, ते जाणून

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार सक्रिय असतात. रोज मोठ्या प्रमाणात शेअर्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. शेअर मार्केटमध्ये सक्रिय असणारे सगळे बाजाराकडे एकाच दृष्टिकोनातून पाहतात असे नव्हे. शेअर्स बाजारात सक्रिय असणाऱ्यांचे ढोबळपणे वर्गीकरण करायचे तर काही जण intraday trading करत असतात तर काही जण मार्केटकडे Investment म्हणून बघत असतात. Intraday vs investment यात काय फरक आहे, ते जाणून घेऊया. 

कालावधीचा फरक 

Intraday व्यतिरिक्तही लहान काळासाठी शेअर्स ट्रेडिंगचे काही प्रकार असतात. Intraday ही बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय झालेला ट्रेडिंगचा प्रकार आहे. डे ट्रेडिंग मध्ये खरेदी केल्यावर त्याच दिवशी शेअर्सची विक्री करणे गरजेचे असते. इन्व्हेस्टमेंटसाठी खरेदी केलेले शेअर्स दीर्घ कालावधीसाठी असते. 

जोखीम कशात जास्त?

डे ट्रेडिंग मध्ये शेअर मार्केटमधील चढ – उतरांवर सतत लक्ष ठेऊन रहाव लागत. इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्सची खरेदी करताना मार्केटमध्ये खूप जास्त सक्रिय असण्याची गरज नसते. 

डे ट्रेडिंग हे जास्त रिस्की मानले जाते. मात्र त्यात ओव्हर नाइट रिस्क नसते. त्याचदिवशी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झालेले असते. इन्व्हेस्टमेंटसाठी गुंतवणूक करताना दीर्घ कालावधीचा विचार केला जातो. दीर्घ कालावधीसाठी शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक ही रिस्क कमी करते असे मानले जाते. 

डे ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करताना सामान्यपणे टेक्निकल अनालिसिसचा विचार केला जातो. टेक्निकल अनालिसिस, चार्ट यासारख्या गोष्टी यात महत्वाच्या मानल्या जातात. डे ट्रेडिंग करणारे फंडामेंटल  अनालिसिसचा फारसा विचार करताना दिसत नाहीत. याउलट इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स खरेदी करणारे फंडामेंटल अनालिसिसचा विचार प्रामुख्याने करत असतात. एखादी कंपनी फंडामेंटली किती स्ट्रॉंग आहे ते इन्व्हेस्टमेंट करताना जास्त महत्वाचे मानले जाते. दीर्घकालीन गुंतवणूकीच्या दृष्टीने बाजारातील तत्कालीन चढ-उतार बरेचदा फारसे विचारात घेतले जात नाहीत. 

डे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट (intraday vs investment) यामध्ये हे सर्वसाधारणपणे फरक आहेत. शेअर बाजारात आपल्याला कशा प्रकारे सहभागी व्हायचे आहे ते आपल्या गरजा आणि जोखीम यावर सामान्यपणे ठरत असते. याविषयी सारासार विचार करून निर्णय घेणे योग्य ठरते. 

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)