Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jan Aushadhi: जेनेरीक स्टोर मध्ये 90% पर्यंत का बरं स्वस्त मिळतात औषधी

Jan Aushadhi

Image Source : www.allaboutvasaivirar.com

PM Jan Aushadhi Store : स्वस्त आणि महाग असा खेळ औषधांच्या बाजारातही गेल्या अनेक वर्षांपासुन स्पष्ट दिसत आहे. सहसा ब्रँडेड औषधे (Patented Medicine) महाग असतात तर जेनेरिक औषधे स्वस्त असतात. प्रधानमंत्री जनऔषधी योजनेत फक्त जेनेरिक औषधे आहेत. आणि, जनऔषधी स्टोअरमध्ये औषधे 90 टक्क्यांपर्यंत स्वस्त असल्याचा त्यांचा दावा आहे.

Generic Medicine : फार्मसी व्यवसायात, जेनेरिक औषधे ही अशी औषधे आहेत ज्यांचे स्वतःचे ब्रँड नाव नाही. असे समजा की, बाजारात सर्फ हे निरमा या नावाने विकले जाते आणि ओळखले जाते. ज्याप्रमाणे म्हातारी लोकं आजही कुठल्याही किराणा दुकानात गेले की, निरमा द्या अशीच हाक दुकानदाराला मारतात. तसेच जेनेरिक औषधे बनवणाऱ्या काही कंपन्यांनी स्वतःची ब्रँड नावेही विकसित केली आहेत. तरीही ही औषधे जेनेरिक नावाने ओळखली जाते आणि अत्यंत स्वस्त आहेत. कारण ते जेनेरिक औषधांच्या श्रेणीत येतात. सरकार जेनेरिक औषधांनाही प्रोत्साहन देत आहे. प्रधानमंत्री जनऔषधी प्रकल्प ही त्याचीच बाजू आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरात जेनेरिक औषधांची दुकाने उघडली जात आहेत. तर बऱ्याच ठिकाणी असंख्य उघडली आहेत. मात्र जेनेरिक औषधांच्या स्वस्ततेमुळे, लोक त्याच्या गुणवत्तेवर आणि त्याच्या सामर्थ्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करीत असतात.

जेनेरिक औषधे कमी प्रभावी आहेत का?

जेनेरिक औषधांचा प्रभाव ब्रँडेड औषधांसारखाच असतो. कारण या औषधांमध्येही ब्रँडेड कंपन्यांच्या औषधांसारखेच ड्रग असते. वास्तविक, ब्रँडेड औषधांच्या ड्रगच्या मिश्रणाच्या फॉर्म्युल्याच्या मक्तेदारीचा कालावधी संपतो, तेव्हा ते सूत्र जगजाहीर होते. समान फॉर्म्युला आणि ड्रग वापरून जेनेरिक औषधे सुरू केली जातात. जेनेरिक औषधं देखील ब्रँडेड औषधांसारख्याच मानकानुसार आणि मार्गदर्शक तत्वानुसार तयार केले जाते, त्यामुळे ते ब्रँडेड औषधांपेक्षा निकृष्ट दर्जाचे ठरत नाहीत.

जेनेरिक औषधे स्वस्त का आहेत?

जेनेरिक औषधे स्वस्त असण्यामागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रथम, कंपनीने संशोधन आणि विकासासाठी कोणताही पैसा खर्च केलेला नाही. कोणतेही औषध बनवण्यासाठी सर्वात मोठा खर्च R&D असतो आणि हे काम औषध शोध कंपनीने आधीच केलेले असते. शिवाय त्याच्या जाहिरातीसाठी कोणताही खर्च होत नाही. या औषधांच्या पॅकेजिंगवर कोणताही विशेष खर्च केला जात नाही. तसेच त्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या उत्पादनाचा फायदा होतो.

जेनेरिक आणि ब्रँडेड (पेटंट) औषधांमध्ये काय फरक आहे?

जेनेरिक औषधे  किंवा ब्रँडेड (पेटंट) औषधांसारखीच असतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये, असे आढळून आले आहे की, ब्रँडेड कंपन्यांचे API किंवा कच्चा माल देखील जेनेरिक औषधांसारख्याच स्त्रोतांकडून आला आहे. जेनेरिक औषधे, समान डोसमध्ये, त्याच प्रमाणात आणि मूळ औषधाप्रमाणेच घेतल्यास, पेटंट केलेल्या औषध किंवा ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणाम होतील. ज्याप्रमाणे जेनेरिक औषधांचे मूळ औषधांसारखेच सकारात्मक परिणाम होऊ शकतात, त्याचप्रमाणे त्यांचे नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. जेनेरिक आणि ब्रँड नेम औषधांमधील मुख्य फरक म्हणजे ब्रँडिंग, पॅकेजिंग, चव आणि रंग. त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्येही फरक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या औषधांच्या किमतीतही खूप फरक आहे. शेवटी, ब्रँडची किंमत मोजावी लागत असते.

जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांमध्ये फरक कसा करायचा?

जेनेरिक औषधांना बहुतेकदा मूळ औषध (Patented Medicine) पेक्षा समान किंवा वेगळे नाव असते. जेनेरिक औषधांमध्ये वापरल्या जाणार्‍या ड्रगची पूर्ण माहिती केमिस्टना असते आणि ते ग्राहकांनाही त्याबद्दल सांगू शकतात. औषधाचे नाव हे त्याच्या ओळखीचे एक महत्त्वाचे संकेतक आहे. त्याचप्रमाणे जेनेरिक औषधे ओळखण्यासाठी ड्रगच्या नावावरून इंटरनेटवर शोध घेता येतो. याव्यतिरिक्त, जेनेरिक औषधांच्या किमती ब्रँड-नावाच्या औषधांपेक्षा खूपच कमी आहेत आणि त्यांचा समान प्रभाव आहे.

प्रधानमंत्री जनऔषधी योजनेची औषधे स्वस्त का?

प्रधानमंत्री जनऔषधी योजनेची औषधे फक्त जेनेरिक आहेत. त्याचे पॅकिंग स्वस्त आहेत. त्याच्या जाहिरातीवर जास्त खर्च होत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या योजनेशी संबंधित दुकानदारांना औषधांच्या विक्रीचे मार्जिनही कमी आहे. त्यामुळे जनऔषधी स्टोअरची औषधे ग्राहकांना स्वस्तात मिळतात. तर बऱ्याचदा 90 टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळतात.