डेट कन्सोलिडेशन (Debt Consolidation) म्हणजे आर्थिक व्यवस्थापनाचा एक प्रकार आहे. या माध्यमातून तुम्ही नवीन कर्ज काढून वेगवेगळ्या व्याज दराची तुमची वेगवेगळी कर्जे फेडू शकता. याला कर्ज एकत्रीकरण असेही म्हटले जाते. डेट कन्सॉलिडेशनच्या माध्यमातून तुमची वेगवेगळी कर्जे एकाच कर्जात एकत्र करू शकता, या एकत्र कर्जाचा व्याजदर तुमच्या इतर कर्जांच्या व्याजदरापेक्षा कमी असू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वाढणाऱ्या कर्जावर एक प्रकारे नियंत्रण मिळवण्यास मदत मिळू शकते.
एक हप्ता आणि व्याजात बचत
अनेकदा पैशाच्या अनावश्यक खर्च वाढल्याने आपत्कालीन परिस्थितीत आपण क्रेडिट कार्डचा वापर करून आपली आर्थिक गरज पूर्ण करतो. मात्र, काहीवेळा या क्रेडिट कर्जाचा व्याजदर अधिक असल्याने कर्ज फेडणे जिकरीचे होऊन बसते. अशा वेळी तुम्ही क्रेडिट कार्ड कर्ज वैयक्तिक कर्जे फेडण्यासाठी कन्सोलिडेशनचा मार्ग अवलंबू शकता. समजा तुमच्याकडे दोन क्रेडिट कार्ड आहेत दोन्ही कार्डवर प्रत्येकी 60 हजाराचे कर्ज आहे. या क्रेडिट कार्डचा व्याज दर 18% आणि 20% टक्के आहे. अशा वेळी तुम्ही डेट कन्सॉलिडेटचा पर्याय वापरण्यासाठी 10 ते 12 टक्क्यांनी जेवढे आवश्यक आहे तेवढ्या रकमेचे कर्ज काढू शकता. समजा तुम्ही 1 लाख 20 हजाराचे कर्ज 10 टक्क्याने काढले तर तुम्ही क्रेडिट कार्डचे कर्ज फेडू शकता. तसेच त्यानंतर तुम्हा एकाच कर्जाचा हप्ता भरू शकता. इथे तुमच्या व्याजाच्या रक्कमेतून बचत होऊ शकते.
व्याजदर महत्त्वाचा-
कर्ज एकत्रीकरण करण्याचा पर्याय तुमच्यासाठी त्यावेळीच योग्य ठरेल ज्यावेळी तुम्हाला किती रक्कम फेडायची आहे? तेवढे कर्ज मिळेल का? तसेच तुम्ही त्या कर्जाची परत फेड करू शकता का? महत्वाचे म्हणजे तुम्ही दुसरे कर्ज काढण्यासाठी पात्र ठरता का? कर्ज एकत्रिकरणासाठी घेतलेल्या कर्जाचा व्याजदर स्वस्त आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. तसेच तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर तुम्हाला एकत्रिकरण कर्ज हे अधिक व्याजदराने घ्यावे लागू शकते.