Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सीटीसी म्हणजे काय? What is Cost to Company?

CTC

CTC ची मोजणी ही संबंधित कर्मचाऱ्याला मिळणारा पगार आणि दिले जाणारे अतिरिक्त लाभ यातून केली जाते.

सीटीसी (CTC) म्हणजे, कॉस्ट टू कंपनी (Cost to Company). ही टर्म विशेषकरून कंपनीत कर्मचाऱ्याला नोकरीवर ठेवताना वापरली जाते. सीटीसी या टर्मचा सोप्पा अर्थ म्हणजे, एखादी कंपनी कर्मचाऱ्यावर एका वर्षासाठी जेवढी रक्कम खर्च करते, त्याला सीटीसी म्हटले जाते. या सीटीसीमध्ये त्या कर्मचाऱ्यावर कंपनी पगार, भत्ते आणि इतर सोयीसुविधा पकडून जेवढा खर्च करते. तो सगळा यामध्ये समाविष्ट असतो. सीटीसी हा प्रत्येक कर्मचाऱ्यानुसार वेगवेगळी असते. ती प्रत्येक कर्मचाऱ्यावर कंपनीकडून केला जाणारा खर्च आणि त्याला दिल्या जाणाऱ्या पगारावर अलंबून असते.

सीटीसीचे एक कॉमन सूत्र आहे. ते म्हणजे सीटीसी = कर्मचाऱ्याचे एकूण वेतन + त्याला दिले जाणारे लाभ. CTC ची मोजणी ही संबंधित कर्मचाऱ्याला मिळणारा पगार आणि दिले जाणारे अतिरिक्त लाभ यातून केली जाते. अतिरिक्त लाभांमध्ये, ईपीएफ (EPF), ग्रॅच्युइटी (Gratuity), घर भत्ता (HRA), फूड कूपन (Food Coupon), वैद्यकीय विमा (Health Insurance), प्रवास खर्च (Travelling Allowance) यांचा समावेश होतो. यामध्ये कंपनीच्या पॉलिसीनुसार काही गोष्टी कमी-जास्त होऊ शकतात.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 45,000 रूपये असेल आणि कंपनीने त्यांच्या आरोग्य विम्यासाठी अतिरिक्त 5,000 रूपये दिले असतील तर त्याची CTC 50,000 रूपये असणार. कर्मचार्‍यांना CTC मध्ये नमूद करण्यात आलेली रक्कम रोख स्वरूपात कधीच मिळत नाही. सीटीसीमध्ये दिसणारी रक्कम ही कंपनीकडून त्या कर्मचाऱ्यावर खर्च केलेली एकूण रक्कम असते आणि या रकमेतून कंपनी पीएफ, विमा आदी प्रकारची रक्कम कपात करून त्याला जी रक्कम देते, त्याला कॅश इन हॅण्ड सॅलरी (Cash in-hand Salary) असे म्हटले जाते. 

Cost to Company-CTC

सीटीसीमुळे अनेक नवीन कर्मचाऱ्यांची गफलत होते. कारण सीटीसीमध्ये दिसणारी रक्कम कर्मचाऱ्याला कधीच मिळत नाही. कारण त्यात खर्च ही समाविष्ट असतात. एका सर्वसाधारण कंपनीत सीटीसीमध्ये कोणत्या गोष्टी दिल्या जातात. त्याबद्दलची माहिती आपण घेऊया. सीटीसी किंवा पगाराच्या या गणितात बेसिक सॅलरी म्हणजेच मूळ पगार हा खूप महत्त्वाचा असतो. कंपनी एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामानुसार व अनुभवानुसार त्याच्यासाठी बेसिक सॅलरी ठरवत असते. जी पूर्णत: त्याच्या कामाशी संबंधित असते. यात कंपनीकडून दिला जाणारा बोनस, भरपाई किंवा नफा असा कोणत्याही लाभाचा समावेश नसतो.  

बेसिक सॅलरीव्यतिरिक्त सीटीसीमध्ये महागाई भत्ता (DA), प्रोव्हिडंट फंड (PF), घर भाडेभत्ता (HRA), वाहतूक भत्ता (Travelling Allowance), फूड कूपन्स, मोबाईलचे बिल यावर खर्च केलेली रक्कम असते.