खिशात क्रेडीट कार्ड असले की खरेदीला मर्यादा राहत नाहीत. सणासुदीला क्रेडीट कार्ड स्वाईप करुन नको असणाऱ्या वस्तू देखील खरेदी केल्या जातात. मात्र याच खरेदीसाठी केलेला खर्च मुदतीत परतफेड न केल्यास पेमेंट डिफॉल्टचा शिक्का बसतो. सिबील रेकॉर्ड खराब होतो. त्यामुळे क्रेडीट कार्ड वापरताना आणि त्याची मुदतीत परतफेड करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
क्रेडीट कार्डवर खरेदीनंतर जेव्हा त्या रकमेची वेळेत परतफेड होत नाही तेव्हा त्यावेळी तुम्हाला विलंब शुल्काचा भुर्दंड सोसावा लागतो. विलंब शुल्क किंवा लेट फी म्हणून थकबाकी असलेल्या रकमेवर बँकांकडून जास्तीत जास्त 42% व्याज वसूल केले जाते.
Table of contents [Show]
क्रेडीट कार्ड वापरताना दोनदा विचार करा
क्रेडीट कार्डने खर्च करताना दोनदा विचार करायला हवा. क्रेडीट कार्डमधून स्वाईप झालेली रक्कम ही तात्पुरत्या स्वरुपाचे कर्ज आहे. ते 45 दिवसांत बँकेला परत फेडावे लागते. त्यामुळे खर्च होणाऱ्या रकमेची 45 दिवसांत तजवीज होईल का याचा विचार करणे आववश्यक आहे. तुमच्याजवळ किती पैसे आहेत किंवा तुमचे मासिक खर्च आणि कर्ज असल्यास त्याचा ईएमआय भरुन क्रेडीट कार्डचे पैसे परतफेड करता येतील का याचा विचार केला तर डिफॉल्ट टाळता येऊ शकतो.
क्रेडीट कार्डसाठी स्वतंत्र बजेट ठेवा
क्रेडीट कार्डसाठी स्वतंत्र बजेट ठेवणे खूप गरजेचे आहे. अचानक एखाद्या तातडीच्या कारणामुळे तुम्ही कार्ड स्वाईप मारले आणि संपूर्ण रक्कम खर्च केली तरी हे बजेट तुम्हाला क्रेडीट कार्डचे थकीत शुल्क भरणे शक्य होईल. तुम्ही शुल्क भरताना पूर्ण भरणे आवश्यक आहे. 1 रुपया जरी कमी भरला तर बँक तुमच्या एकूण थकबाकीवर व्याज आकारू शकते.
तुमच्या भावनांना आवरा
भावनेच्या भरात खरेदी करणे टाळा. अनेकदा फेस्टिव्ह ऑफर्स,सेल, डिस्काउंट्स या ट्रॅपमध्ये आपण अडकतो आणि कार्ड स्वाईप करुन मोकळे होतो. मात्र छोट्या छोट्या खरेदीतून एक मोठी रक्कम खर्च होते. म्हणून तुम्हाला परत फेड करणे झेपेल इतकाच क्रेडीट कार्डचा वापर करायला हवा.
इमर्जन्सी फंडाची तरतूद आवश्यक
क्रेडीट कार्डने जरी तुम्हाला तात्काळ पैशांची गरज भागवता आली तरी त्याचे लिमीट संपल्यावर पुढे काय? असा प्रश्न निर्माण होते. सर्वसाधारणपणे एकाच स्त्रोतावर अवलंबून राहू नका. जर तुम्ही क्रेडीट कार्डचे पैसे मुदतीत भरु शकले नाहीत तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात सापडाल. तुमचा सिबील रेकॉर्ड खराब झाला तर पुन्हा कर्ज मिळवणे अवघड बनेल. अशा संकटकाळात इमर्जन्सी फंड कामी येऊ शकतो. इमर्जन्सी फंडातील रक्कम तुम्हाला क्रेडीट कार्डचे ड्युस भरण्यास उपयोगी पडेल.