Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Certificate of Coverage म्हणजे काय? आणि ते कसे मिळवायचे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

what is certificate of coverage

Certificate of Coverage: सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज हे असे एक प्रमाणपत्र आहे; ज्याद्वारे संबंधित व्यक्तीला कोणकोणत्या सामाजिक आणि विमा सुरक्षा मिळत आहे, याची माहिती कळते.

Certificate of Coverage: तुम्ही दर परदेशात जाऊन काम करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज हे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहे. या सर्टिफिकेटच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची सामाजिक आणि विमा सुरक्षा अधोरेखित केली जाते.

भारतात राहणारे जे नागरिक परदेशात जाऊन काम करू इच्छित आहेत. अशा व्यक्तींनी हे सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज प्रमाणपत्र आपल्या सोबत ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा त्या व्यक्तीला त्या देशातील सामाजिक सुरक्षाविषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आर्थिक योगदान द्यावे लागेल. या आर्थिक बोजातून स्वत:चा बचाव करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund Organisation-EPFO) वेबसाईटवरून या सर्टिफिकेटसाठी अर्ज करू शकता. चला तर मग सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज कसे मिळवायचे याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ.

सर्टिफिकेट ऑफ कव्हरेजसाठी असा करा अर्ज

सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज (Certificate of Coverage) मिळवण्यासाठी ईपीएफओच्या (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येतो.

  • सर्वप्रथम EPFO च्या वेबसाईटवर जा आणि Application for CoC वर क्लिक करा.
  • तुमच्याकडे असलेल्या UAN क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग-इन करा.
  • लॉग-इन केल्यानंतर तुमचा Member ID निवडा.
  • आता संबंधित माहिती भरा आणि तुमच्या पासपोर्टची कॉपी अपलोड करा.
  • तुमचा ऑनलाईन अर्ज व्हेरिफिकेशन आणि संमतीसाठी कंपनीकडे पाठवला जाईल.
  • व्हेरिफाय आणि संमत झालेला अर्ज ईपीएफओच्या स्थानिक कार्यालयात परवानगीसाठी पाठवला जाईल.
  • ईपीएफओच्या कार्यालयाची परवानगी मिळाल्यानंतर सदर सर्टिफिकेट पोर्टलवरून डाऊनलोड करता येते.