• 07 Dec, 2022 10:06

What is candlestick in stock market? शेअर मार्केटमध्ये कॅन्डलस्टिक म्हणजे काय?

What Is Candlestick In Stock Market

candlesticks chart: हे शेअर्स बाजारातील शेअर्सच्या किमतीतील चढ-उतार अभ्यास करण्यासाठीचे एक साधन किंवा पद्धत आहे. candlesticks chart हे शेअर्सच्या टेकनिकल ॲनालिसिसचे सर्वाधिक लोकप्रिय साधन असून शेअर्स मार्केट मध्ये रस असणाऱ्या सर्वांना candlesticks chart माहित असतो. तुम्ही सुद्धा जाणून घ्या, शेअर मार्केटमध्ये कॅन्डलस्टिक म्हणजे काय?

What is candlestick in stock market: कॅण्डल ही शेअरची एका  ठराविक कालावधीत झालेली किंवा होणारी हालचाल दाखविण्याची एक पद्धत आहे. जपानी व्यापारी मोनेहीसा हुमा यांनी प्रथम हा पॅटर्न मांडला. तांदळाचा व्यापार करताना काही वर्ष त्यांनी त्याच्या किंमतींची नोंद ठेवली ज्यानुसार किमती ह्या मनमानी प्रकारे वाढत किंवा कमी होत नाहीत तर त्यामध्ये एक पॅटर्न असतो. हे त्यांच्या लक्षात आले, नंतर त्यांनी दोन प्रकारच्या कॅण्डल शोधून काढल्या. पुढे सर्व व्यापारात यांचा उपयोग सुरु झाला आणि शेअर बाजार सुरु झाल्यानंतर स्टॉकच्या (stocks)किमतीही हा पॅटर्न पाळतात हे समजायला वेळ नाही लागला.

कॅन्डलस्टिक चार्ट (candlesticks chart) हे शेअर्स बाजारातील शेअर्सच्या किमतीतील चढ-उतार अभ्यास करण्यासाठीचे एक साधन किंवा पद्धत आहे. candlesticks chart हे शेअर्सच्या टेकनिकल ॲनालिसिसचे सर्वाधिक लोकप्रिय साधन असून शेअर्स मार्केट मध्ये रस असणाऱ्या सर्वांना candlesticks chart माहित असतो. सुरवातीला कॅण्डल ह्या काळा आणि सफेद या दोन रंगाच्या होत्या ज्यांचा रंग बुद्धिबळाच्या सोंगट्याच्या रंगावरून प्रेरित झालेला होता. यामध्ये सफेद ही तेजीची तर काळी कॅण्डल ही  मंदीची दर्शक होती. सध्या जगभरामध्ये तेजीच्या कॅण्डल साठी हिरवा तर मंदीच्या कॅण्डल साठी लाल रंग वापरला जातो. Candlesticks चे तसे दोन प्रकार पडतात. पहिला म्हणजे SINGLE CANDLESTICK PATTERN आणि दुसरा म्हणजे DOUBLE CANDLESTICK PATTERN. 
 

ग्रेव स्टोन डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न  (GRAVE STONE DOJI CANDLESTICK PATTERN)

या प्रकारच्या कॅन्डल स्टिकचे नाव जपानी लोकांनी कबर वरती जो दगड लावला जातो त्यावरून ठेवले आहे.  ही कॅण्डल दोन प्रकारे दिसू शकते चित्रांमध्ये ते दोन्ही प्रकार दर्शविले आहेत  ग्रेव स्टोन डोजी कॅण्डलमध्ये सुरु भाव (ओपन प्राईस ) आणि बंद भाव ( क्लोज प्राईस) हे समान असतात.  हा कॅण्डल प्रकार ओळखण्यासाठी  महत्त्वाची बाब म्हणजे  यामध्ये वरचा शॅडो / विक खालच्या शॅडोच्या तुलनेने लांब असतो. ग्रेव स्टोन डोजीमध्ये कोणताही रंग दर्शविला जात नाही, म्हणजे हिरवा किंवा लाल

हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न  (HAMMER CANDLESTICK PATTERN)

हातोड्यासारखं नाव असणाऱ्या आणि तसेच चिन्ह ही असणाऱ्या ह्या स्टिकचे काम म्हणजे त्याची तेजी दर्शविणे, म्हणजेच शेअर मार्केटमध्ये मंदी संपण्याची वेळ आलेली असून आता बाजार पुन्हा तेजीकडे वळणार आहे याचे संकेत हे कॅन्डलस्टिक देते. खरेदीदार आणि विक्रेते यामध्ये खूप चढाओढ होते आणि शेवटी खरेदीदार बंद भाव सुरू भावाच्या जवळपास आणण्यात यशस्वी होतात तेव्हा हॅमर कॅन्डल स्टिक बनते. हॅमरमध्ये शॅडो / विक ही बॉडीपेक्षा जवळजवळ दुप्पट असते. तसे तर रंगाचे जास्त महत्त्व नाही, पण तेजी दर्शक आहे त्यामुळे हिरव्या रंगाची हॅमर बनत असेल तर उत्तमच.

हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न  (HANGING MAN CANDLESTICK PATTERN)

या Candlesticks चे नाव हे फाशीवर झुलत असलेल्या माणसावरून या कॅण्डलस्टीकचे नाव हँगिंग मॅन असे ठेवले आहे, आणि आता माणूस लटकून मरणार म्हटलं की त्यावरून समजलच असेल ही एक मंदी दर्शविणारी कॅन्डलस्टिक आहे. कँडल दिसली की समजून जा आता उधळणाऱ्या bull ची  तेजी संपून खाली मान घालून धावणारे bear मंदी करायला येत आहे. ही दोन प्रकारे बनते एक लाल हँगिंग मॅन कॅण्डलस्टीक आणि दुसरी हिरवी hanging man Candlesticks नेहमीप्रमाणे यालाही रंगाचा खूप काही फरक पडत नाही.  

शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न (SHOOTING STAR CANDLESTICK PATTERN)

तुटता तारा या नावाचे हे कॅन्डलस्टिक आहे.  चार्ट मध्ये हा निखळणारा तारा मंदी दर्शक आहे. ही कॅन्डलस्टिक नेहमी चार्टच्या टॉप ला बनते ( तसे चार्टच्या मधेही बनू शकते पण त्याकडे दुर्लक्ष करावे हा फसवा संकेत असू शकतो )  शेअर किंवा निर्देशांकात तेजी चालू असताना ही कॅन्डल स्टिक बनते.  आणि तिथून मंदीची सुरुवात होणार असे संकेत मिळतात. शूटिंग स्टारमध्ये शॅडो / विक ही बॉडी पेक्षा दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त लांब असते. कधी कधी बॉडीच्या दहा पटही असु शकते. शूटिंग स्टार चार प्रकारे बनते चित्रात पाहू शकता या इतर  प्रकारांप्रमाणेच  काम सारखेच असते.

मारूबोजू कॅन्डलस्टिक पॅटर्न (MARUBOZU CANDLESTICK PATTERN)

ह्या candle चे नाव जपानी लोकांनी त्याच्या अर्थावरून म्हणजेच त्याचा अर्थ डॉमिनन्स म्हणजे वर्चस्व हाच या कॅण्डल चा मुख्य आधार आहे या कॅण्डलस्टिक मध्ये फक्त एकाच प्रकारच्या ट्रेडर्सचे ( खरेदीदार किंवा विक्रेते ) यांचे  वर्चस्व असते.  या प्रकारची कॅण्डल स्टिक कमोडिटी मार्केट ट्रेडिंग (COMMODITY MARKET TRADING )  करताना जास्त दिसून येतात.  खास करून क्रूड ऑइल ( CRUDE OIL TRADING ) या कमोडिटी मधे. मारूबोजू कॅण्डल मध्ये शॅडो / विक बनत नाही आणि असेलच तर अगदी नगण्य. ही एक लांब कॅन्डल स्टिक असते जर छोट्या आकाराची मारूबोजू सारखी दिसणारी कॅन्डल स्टिक बनत असेल तर ती फसवी मारूबोजू ( FALSE MARUBOZU ) आहे हे समजून घ्यावे,  तिला मारूबोजू कॅन्डल स्टिक मानता येणार नाही.