Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bite-sized Insurance: बाईट-साईज इन्शुरन्स म्हणजे काय?

What is Bite-sized Insurance

Bite-sized Insurance: “बाईट-साईज इन्शुरन्सचा” उद्देश हा अल्प-मुदतीसाठी ठराविक प्रकारच्या संभाव्य धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण देणे हा आहे.

कोणीतरी असे म्हटले आहे की, “big things come in small packages”. बाईट-साईज इन्शुरन्स (Bite Sized Insurance) हा वित्तीय व्यवस्थापनाचा असाच काहीसा प्रकार आहे. अत्यंत कमी कालावधीसाठी पण नेमक्या गरजा भागविणारी आणि बहुतांशवेळा डॉक्युमेंटस् किंवा विविध चाचण्या (Test) थेट “बाय-पास” करून स्मार्टफोनच्या एका क्लिकवर उपलब्ध होणारी आणि तरीदेखील अत्यंत कमी प्रीमियम आकारणारी इन्शुरन्स पॉलिसी म्हणून “बाईट-साईज इन्शुरन्स” किंवा “स्मॉल तिकीट इन्शुरन्स” किंवा “सॅशे (Sachets) इन्शुरन्स” असा विविध नावांनी ओळखली जाते.

संभाव्य धोक्यांपासून मिळणारे आर्थिक संरक्षण

मायक्रोइन्शुरन्स हे अल्प-उत्पन्न घटकांतील व्यक्तींच्या आणि कुटुंबांच्या सक्षमीकरणाचे, कमी प्रीमियममध्ये त्यांना आर्थिक संरक्षण पुरविणारे एक साधन आहे. तर दुसरीकडे, “बाईट-साईज इन्शुरन्सचा” उद्देशच अल्प-मुदतीसाठी ठराविक प्रकारच्या संभाव्य धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण आहे. मग तो एखाद्या प्रवासापुरता “ट्रिप इन्शुरन्स” असो किंवा विशिष्ट आजारपणापासून संरक्षण देणारा “डिसीझ इन्शुरन्स” असो. नावाप्रमाणेच, अशा पॉलिसी संपूर्ण पॅकेजच्या ऐवजी ‘sachets’ मध्ये उपलब्ध आहेत. जर सर्वसमावेशक “हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी” दीर्घकालीन पॅकेज असेल, तर “डेंग्यू इन्शुरन्स पॉलिसी” ही एक अल्पकालीन पॅकेज आहे.

शून्य पेपरवर्क आणि नाममात्र प्रीमिअम

बाईट-साईझ इन्शुरन्स हे बर्‍याचदा अतिशय सोप्या अटी आणि शर्तींसह “सरळ विमा पॉलिसीज्” असल्याने त्यांची खरेदी जवळजवळ विना-अडथळा आणि कमीतकमी डॉक्युमेंट्सच्या सहाय्याने शक्य असते. त्याचबरोबर प्रीमियम देखील सर्व पॉलिसीधारकांसाठी समान असतो. अशा पॉलिसींना जास्त अंडररायटिंग आणि किमतीची आवश्यकता नसते. ऑनलाईन ग्रुप प्लॅटफॉमवर उपलब्धता, नाममात्र प्रीमियम, शून्य पेपरवर्क, ऑनलाईन पॉलिसी डॉक्युमेंट्स आणि सहज सुलभ क्लेम प्रोसेस यांमुळे या इन्शुरन्स पॉलिसीज् कस्टमर-केंद्रीत आहेत.

मात्र बाईट-साईझ इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी क्लेमच्या अटी-शर्ती आणि क्लेम सेटलमेंट रेशो (प्रमाण) लक्षात घेणे, अधिकृत इन्शुररकडूनच पॉलिसीज् खरेदी करणे, ओव्हरलॅप कव्हर करणाऱ्या अथवा परवडणारी, सहज खरेदी करता येण्यासारखी आहे म्हणून कोणत्याही पॉलिसीज् विकत घेण्याचे टाळणे, या गोष्टी मात्र लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे.

बाईट-साईज इन्शुरन्सचे प्रकार | Types of Bite Sized Insurance

बाईट-साईज इन्शुरन्स आरोग्य किंवा कार विम्यापुरता मर्यादित नाही. पॉलिसीधारक त्याच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन इन्शुरन्सचे कव्हर आणि कालावधी निवडू किंवा बदलू शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर, स्मार्टफोनची ऑनलाईन खरेदी करताना आपण “मोबाईल स्क्रीन सिक्युरिटी इन्शुरन्स” देखील खरेदी करू शकतो. ईमेल फिशिंग आणि स्पूफिंग यासारखे आर्थिक नुकसान कव्हर करणारी “ऑनलाईन सिक्युरिटी इन्शुरन्स”, प्रवासातल्या चोरीपासून संरक्षण देणारी “बॅगपॅक इन्शुरन्स”, हायर केलेल्या वाहनातून प्रवास करताना “कॅब राईड इन्शुरन्स”, क्रेडिट कार्ड सेक्युरिटी इन्शुरन्स, फ्लाईटचे उड्डाण विलंबाने झाल्यास होणारे नुकसान संरक्षित करणारा इन्शुरन्स, अगदी फटाक्यांपासून होणाऱ्या दुखापतींपासून संरक्षित करणारा “”फायरवर्क्स इन्शुरन्स” असे शॅम्पूच्या sachet प्रमाणे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत.

ट्रेनच्या तिकिटावर मिळणारा इन्शुरन्सही बाईट-साईज

युनायटेड स्टेट्समध्ये “लेमोनेड” किंवा चीनमधली “ZhongAn” या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बलाढ्य बाईट-साईज इन्शुरन्स पुरविणाऱ्या कंपनी आहेत. डिजिट इन्शुरन्स, Mobikwik, PhonePe, Flipkart, Paytm सारख्या कंपन्या, टॉफी इन्शुरन्स सारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्मस् देखील बाईट-साईज इन्शुरन्स प्रदान करत आहेत. IRCTC वेबसाईटवर आपल्या ट्रेनच्या तिकिटासह मिळणारा विमा हा देखील बाईट-साईज इन्शुरन्स आहे. 

कमी प्रीमियम म्हणजे कमी कव्हरेज

एकतर पॉलिसीधारकांना या उत्पादनांमधून फारसे नुकसान होत नाही. “कमी प्रीमियम म्हणजे कमी कव्हरेज” असले तरीदेखील भरलेल्या प्रीमियमवर कोणतेही मोठे नुकसान न करताही पुढील वर्षी कव्हरचे नूतनीकरण (renewal) करणे अथवा न करणे, पैकी पर्याय पॉलिसीधारक निवडू शकतात. अर्थात अशी उत्पादने तात्पुरती उपाय आहेत आणि दीर्घकालीन योजनांचा पर्याय म्हणून त्यांचा विचार करणे, शक्य नाही आणि ही उत्पादने मुख्यतः ग्रुप प्लॅटफॉर्मवर विकली जात असल्याने, इन्शुरर आणि एजन्ट्स केव्हाही आपली जबाबदारी झटकू शकतात. थोडक्यात, स्मूथ, सुपरफाईन कव्हरवरून पुस्तकाच्या पानांचा दर्जा ठरविणे तसे जोखीम (रिस्क) घेण्यासारखेच आहे.